Cell Phones, Laptops स्वच्छ कसे ठेवाल? बॅक्टेरिया, व्हायरस चा धोका कमी करण्यासाठी असे करा Disinfect!
यामध्ये तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉपचाही समावेश आहे. इलेक्टॉनिक वस्तू महागड्या असल्याने त्या काळजीपूर्वक स्वच्छ करणंदेखील आवश्यक आहे.
भारतामध्ये मागील 3 महिन्यांपासून असलेली कोरोनाशी दहशत आजही कायम आहे. अशामध्ये अद्याप कोरोनावर औषध नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सतत हात स्वच्छ धुणं. वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. यासोबतच नागरिकांना तुम्ही वारंवार वापरत असलेल्या गोष्टी स्वच्छ ठेवण्याच्या त्या वारंवार निर्जुंतक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामध्ये तुमचा स्मार्टफोन, लॅपटॉपचाही समावेश आहे. इलेक्टॉनिक वस्तू महागड्या असल्याने त्या काळजीपूर्वक स्वच्छ करणंदेखील आवश्यक आहे. त्यामुळे या वस्तू डिसइंफेक्ट करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे देखील जाणून घ्या.
सेल फोन स्वच्छ ठेवताना कोणती काळजी घ्याल?
सेल फोन, स्मार्ट फोन या नेहमीच्या वापरातील गोष्टी आहेत. त्यामुळे फोन साफ करताना 70% अल्कोहलयुक्त रबिंग व्हाईप्सचा वापर करा. त्याने फोन स्वच्छ ठेवणं सुरक्षित आहे. तुम्हांला अशाप्रकारचे व्हाईप्स तुमच्या जवळच्या दुकानामध्ये मिळत नसतील तर मायक्रो फायबर क्लॉथवर रबिंग अल्कोहल टाकून फोनची स्क्रीन आणि मागचा भाग स्वच्छ करा. फोनचा दोन्ही भाग जसा स्वच्छ करणं आवश्यक आहे तशीच फोनची केसदेखील आधी साबण्याच्या पाण्याने आणि नंतर डिसइंफेक्टंट व्हाईप्सने पुसणं आवश्यक आहे.
लॅपटॉप्सची काळजी घेताना
वर्क फ्रॉम करणार्यांमध्ये तुमच्या लॅपटॉप्सवर कीटाणूंचा धोका कमी आहे. मात्र तुम्हांला ऑफिसमध्ये नियमित जावं लागत असेल तर दिवसाची किंवा कामाची सुरूवात करण्यापूर्वी तो डिसइंफेक्ट करून घेणंदेखील गरजेचे आहे. फक्त क्रॅक्समध्ये कुठे ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. त्यामुळे अशी डिव्हाईक स्वच्छ करताना थेट स्प्रे करण्याऐवजी कापडावर अल्कोहल बेस्ड सॅनिटायझर घेऊन तो स्वच्छ करा.
घरीच असाल तर आठवड्यातून 1-2 वेळेस इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वच्छ करणं पुरेसे आहे. पण नियमित बाहेर पडत असाल तर विशेष खबरदारी घ्या. स्मार्ट्फोन, सेलफोन हा सतत वापरला जात असल्याने तो नियमित स्वच्छ करा. त्यावर वायरस, बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो.