पायात पैंजण घालणे महिलांसाठी ठरू शकते आरोग्यदायी; फायदे ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
पण तुम्हाला माहित आहे का या हे पैंजण महिलांसाठी, मुलींसाठी आरोग्यवर्धक असेही आहेत. हे पायात घातल्याने अनेक महत्त्वाचे फायदे त्या महिलेला होऊ शकतात.
स्त्रीच्या सौंदर्य शब्दांत व्यक्त करता येणार नाही. त्यात कुंकू, बांगड्या यांसारख्या 16 श्रृंगारांनी हे सौंदर्य आणखीनच खुलून येते. या 16 श्रृंगारांपैकी एक म्हणजे स्त्री च्या पायातील पैंजण. या पैंजणांच्या आवाजाने घरात प्रसन्न वातावरण राहते. काही महिलांच्या बाबतीत तर तिच्या पैंजणांचा आवाज तिची ओळख असते. तिच्या पैंजणांच्या आवाजाने आपण तिला दुरुनही ओळखू शकतो. असं म्हणतात, ज्या घरात स्त्रीच्या पैंजणाचा आवाज असतो तिथे कधीच वास्तूदोष नसतो.
हा झाला तर्क-वितर्काचा भाग. पण तुम्हाला माहित आहे का या हे पैंजण महिलांसाठी, मुलींसाठी आरोग्यवर्धक असेही आहेत. हे पायात घातल्याने अनेक महत्त्वाचे फायदे त्या महिलेला होऊ शकतात.
पाहूया हे महत्त्वाचे फायदे:
1. पायांचू सूज कमी होते:
ज्या महिलांना पाय सुजण्याची समस्या आहे त्यांनी पायात चांदीच्या पैंजण घातल्यास बराच लाभ मिळतो. ह्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली होते आणि नैसर्गिकरित्या पाय सुजणे थांबण्यास मदत होते.
2. हाडे मजबूत होतात:
सोने किंवा चांदीचे पैंजण घातल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. महिलांचे वय जसजसे वाढते तसे त्यांच्यातील कॅल्शिअम कमी होण्यास सुरुवात होते. कॅल्शिअमची कमतरता अनेक दुखापतींना कारणीभूत ठरते. त्यामुळे ज्यांच्या मध्ये अगोदरच कॅल्शिअम कमी आहे त्यांनी पैंजण घालणे फायद्याचे ठरु शकते.
हेदेखील वाचा- पायाच्या अंगठ्यापेक्षा 'हे' बोट मोठ असल्यास आयुष्यात होतात फायदे, जाणून घ्या
3. शरीरातील विद्युत ऊर्जा टिकवून ठेवते:
पैंजण पायातून निघणारी शारीरिक ऊर्जा शरीरात टिकवून ठेवते. आपल्या शरीरातील पोटॅशिअम, कॅल्शिअम, आणि मॅग्नेशिअम मध्ये काही विशिष्ट विदयुत ऊर्जा असते ज्याला ईऑन्स (ions) असेही म्हणतात. जवळपास सर्वच पेशी ह्यांचा उपयोग विदुयत ऊर्जा तयार करण्यासाठी करतात. त्यामुळे शरीरास आवश्यक असलेली ऊर्जा साठवून ठेवण्यास पैंजण मदत करतात.
4. शरीरातील अतिरिक्त चरबी नियंत्रणात आणते:
पैंजण पोटावर आणि त्या खालच्या भागावर चरबी वाढण्याचा वेग कमी करते. शरीरात अतिरिक्त चरबी वाढणं स्थूलपणाचं लक्षण असतं. त्यामुळे ही चरबी नियंत्रणाता आणण्यासाठी पैंजण मदत करतात.
5. महिलेची इच्छाशक्ती मजबूत होते:
पैंजणांमुळे विशेष करुन त्याच्या आवाजामुळे महिलेमधील इच्छाशक्ती मजबूत होते. घरासाठी महिला रात्रंदिवस राबत असते. अशा वेळी तिच्या व्यस्त जीवनामुळे तिची अनेकदा चिडचिड होते. अशा वेळी छुमछुम आवाज करणारे पैंजण तिच्या नवा ऊर्जा, उत्साह निर्माण करण्यास मदत करतात. तसेच तिच्या शरीरातील थकवा देखील दूर होतो.
वास्तूशास्त्रानुसार, स्त्री च्या पायातील पैंजणामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर नेऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. पैंजणांच्या आवाजामुळे घरातील अशुद्ध वातावरण शुद्ध होते. त्यामुळे पैंजण हे जरी स्त्रीच्या सौंदर्यास चार चांद लावणारे असले तरीही ते तिच्या शरीरासाठी हितवर्धक आहेत. आजच्या पिढी सहजा पैंजण घालणे पसंत करत नाही. त्यामुळे जर फायदे ऐकून कदाचित त्यांचा कल पैंजण घालण्याकडे जाऊ शकतो.