पायाच्या अंगठ्यापेक्षा 'हे' बोट मोठ असल्यास आयुष्यात होतात फायदे, जाणून घ्या

ज्योतिषशास्रानुसार पायावरुन किंवा हातावरील रेषांवरुन आपले पुढील भविष्य कसे असेल ते ज्योतिषांकडून सांगितले जाते. तर पायाची उत्तम ठेवण याच्यासह पायांची बोटे किंवा त्याची त्वचासुद्धा आपल्या नशीबाची दारे उघडू शकतात.

पायाच्या अंगठ्यापेक्षा 'हे' बोट मोठ असल्यास आयुष्यात होतात फायदे, जाणून घ्या
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ज्योतिषशास्रानुसार पायावरुन किंवा हातावरील रेषांवरुन आपले पुढील भविष्य कसे असेल ते ज्योतिषांकडून सांगितले जाते. तर पायाची उत्तम ठेवण याच्यासह पायांची बोटे किंवा त्याची त्वचासुद्धा आपल्या नशीबाची दारे उघडू शकतात. यावरुन तुमचे भाग्य तुम्हाला साथ देते आहे की नाही हे सुद्धा पायांवरुन काही वेळेस सांगितले जाते.

एखाद्या व्यक्तीला त्याच्या भविष्यातील काही गोष्टी कोणत्या पद्धतीने घडतात किंवा त्यामध्ये काही अडथळा येतो का हे पाहण्यासाठी ते ज्योतिषांचा सल्ले घेणे योग्य मानतात. तर ज्योतिषांकडून तुमच्या हातांची नखे, केस दात किंवा पाय याच्यावरुन तुमचे भवितव्य कसे असणार त्याची शक्यता वर्तवतात. तर जाणून घ्या पायाच्या अंगठ्यापेक्षा 'हे' बोट मोठ असल्यास भविष्यात काय फायदे होतात.

-पायाच्या बोटांमधील तर्जनी जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर अशी व्यक्ती खूप भाग्यवान मानली जाते. तसेच असे बोट असणारी व्यक्ती सौभाग्य सूचक मानली जाते.

-मृदू, नरम आणि चमकदार लाल तळवे असलेले पाय सुखमय भविष्याचे संकेत देत असतात. ज्यांचे पाय असे असतात त्यांना आयुष्यात खूप सुख आणि वैभव प्राप्त होते.

-आपल्या पायाचा अंगठा जर सामान्यपेक्षा अधिक मोठा आणि जाड असेल तर असा अंगठा आपल्यासाठी चांगले संकेत देत नाही. अशा लोकांचं भाग्य खूप फलदायी नसते. खूप मेहनत करूनही अशा लोकांना मनासारख फळ मिळत नाही.

-ज्या व्यक्तींच्या नखांवर डाग, तुटलेली नखे असल्यास त्यांना नशीबही साथ देत नाही. अशा लोकांना घरबसल्या समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच अशा लोकांच्या आयुष्यात नेहमीच आर्थिक संकट उद्भवतात.

-ज्या व्यक्तींच्या गुडघ्यावर हाड दिसत नाही, अशा लोकांना नशीबाची साथ मिळत नाही. आयुष्यात खूप मेहनत करूनही अशा लोकांना यश मिळत नाही. त्यांना खूप संघर्ष करावा लागतो.

(हेही वाचा-हातावरील V अक्षराचे महत्व काय आहे माहिती आहे का? जाणून घ्या)

तर वरील काही पायांबाबतच्या गोष्टींवरुन तुम्हाला भवितव्याची शक्यता वर्तवली जाते. तसेच आयुष्यातील वाईट गोष्टींपासून दुर राहायचे असल्यास ज्योतिषी तुम्हाला उपायसुद्धा सांगतात.

(The above story first appeared on LatestLY on Jul 04, 2019 09:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).