झोपायच्या आधी पिस्ता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? जाणून घ्या अधिक
कारण हे पौष्टीक आणि चवीलाही छान असतात. पिस्ता खाण्याचे फायदे आरोग्यदायी आणि खूप चांगले आहे, असं बरेच जण म्हणतात आणि ते खरंही आहे.
पिस्ता खायला बऱ्याच जणांना आवडतात, खासकरून मीठ लावलेले पिस्ते. कारण हे पौष्टीक आणि चवीलाही छान असतात. पिस्ता खाण्याचे फायदे आरोग्यदायी आणि खूप चांगले आहे, असं बरेच जण म्हणतात आणि ते खरंही आहे. पिस्ता खरोखरच आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन ई (Vitamin E), व्हिटॅमिन बी 3(VitaminB3), प्रोटिन (protein),फायबर(Fiber), अँटिऑक्सिडंट(Antioxidants) आणि पोटॅशिअम (Potassium) असते. हे घटन आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात.
परंतु सर्व काही योग्य प्रमाणात खाणे नाहीतर ते आपल्या आरोग्यासाठी वाईट ठरू शकते, तर पिस्ताच्याबाबतीतही या दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल.(World Mental Health Day 2021: मुलांच्या मानसिक वाढ, विकासासाठी आहारातील हे Foods ठरतील प्रभावी, घ्या जाणून)
पिस्ता हा पचनासाठी फार उत्तम मानला जातो. जो आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी खूप योगदान देतो. मेंदू ते हृदय आणि अगदी रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत या स्वादिष्ट सुकामेवा सेवन केल्याने तुम्ही अनेक फायदे पाहू शकता. म्हणूनच आपल्या नियमित आहारात पिस्ता समाविष्ट करणे उत्तम कल्पना आहे.
>>पिस्ताचं सेवन कधी करावे?
रात्री चांगली झोप येण्यासाठी पिस्ता खाण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पिस्ता रात्री झोपण्याआधी नक्की खावा. याचा उष्मांक जास्त प्रमाणात नाही. तसंच यात मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी 6 आणि प्रथिने समृद्ध आहेत. ज्यामुळे तुम्हाला अगदी छान झोप लागेल. पण पिस्ता आरोग्यदायी आहे म्हणून त्याचं अतिसेवनही करू नका. ते झोपण्याआधी चांगल ठरणं नाही.