चेहऱ्याच्या नितळ स्किनसाठी उपयुक्त Ghee, जाणून घ्या फायदे

तर जाणून घ्या काय आहेत तूपाचे फायदे

तूप (फोटो सौजन्य- ट्विटर)

शुद्ध तूपाचे शरीराला खूप प्रमाणात फायदे होतात. परंतु तुम्हाला तूप (Ghee) खाणे पसंद नसले तरीही तूपाचे हे फायदे तुमच्या आरोग्याला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतील. तर जाणून घ्या काय आहेत तूपाचे फायदे :-

1. स्किन कोरडी पडण्यापासून सुटका

स्किन कोरडी पडू नये म्हणून विविध उपाय केले जातात. तसेच बाजारात यासाछी विविध कंपनीचे लोशन्स उपलब्ध असतात. मात्र जास्त पैसे न खर्च करता घरच्या घरी बनविलेल्या तूपाचा उपयोग स्किन कोरडी न होण्यासाठी केला तर हा उत्तम पर्याय आहे.

2. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत

जर तुमच्या चेहऱ्यावर वयोमानानुसार आधीच सुरकुत्या पडण्यास सुरुवात झाली असल्याच तूप हे या समस्येवर अत्यंत गुणकारी आहे. तसेच तूपामध्ये विटामिन 'ई' असल्याने ते ऐंटीएजिंग चे कार्य करते. त्यामुळे नियमितपणे तूप चेहऱ्यावर थोडावेळ लावल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल.

3. अंघोळ केल्यानंतर तूप वापरा

अंघोळ केल्यानंतर जर तुम्ही अंगाला तेल लावणे पसंद करत असाल तर थांबा आणि तूपाचा वापर करा. तसेच तेलामध्ये 5 चमचे तूप टाकून ते मिश्रण एकत्र करुन अंगाला लावल्यास स्किन मऊ होते.

4. थकलेल्या डोळ्यांसाठी उत्तम

डोळे थोडे अंधूक आणि थकलेले वाटत असतील तर तूपाचा वापर करा. तसेच डोळ्यांच्या बाजूच्या भागाला तूपाने मसाज केल्यास त्याचा काही दिवसांनी फरक जाणवून सातत्याने थकलेल्या वाटणाऱ्या डोळ्यांना आराम मिळू शकतो. मात्र मसाज करताना तूप डोळ्यात जाणार नाही याची काळजी जरुर घ्यावी.

5. ओढांसाठी उपयुक्त

थंडीच्या दिवसात ओठ फाटण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी ओठांवर तूपाचा हलका लेप लाऊन ठेवला तर ओठ मऊ होतील. तसेच ओठांना तूपामुळे वेगळीच चमक येईल.