Post Holi Skin Care Tips: होळी (Holi 2025) हा रंगांचा सण आहे. होळीला खेळण्यात येणारे रंग हे अनेकदा तीव्र रसायनांपासून बनवले जातात. या रसायनांमुळे ऍलर्जी होऊ शकते, संपर्क त्वचारोगाचा त्रास होऊ शकतो, त्वचेची स्थिती बिघडू शकते, जळजळ होऊ शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रासायनिक रंगांमुळे त्वचेवर जळजळ आणि खाज थांबवण्यासाठी काही उपाय सांगणार आहोत.
बेसन, दूध आणि हळदीचा घरगुती पॅक -
प्रथम, वाळलेल्या रंगाना हळूवारपणे झटका. त्वचेला जोरात घासू नका. तुमची त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा. रंग हलक्या हाताने काढण्यासाठी सौम्य हर्बल क्लींजर किंवा बेसन, दूध आणि हळदीचा घरगुती पॅक वापरा. जोरजोरात घासल्याने त्वचेला जळजळ होऊ शकते आणि त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते. (Holi 2025: होळी खेळताय? जाणून घ्या कशी घ्यावी त्वचा आणि केसांची काळजी (Tips))
त्वचेला मॉइश्चरायझर करा -
रंग, सूर्य आणि पाण्याच्या संपर्कातून बरे होण्यासाठी तुमच्या त्वचेला अतिरिक्त काळजी आणि पोषणाची आवश्यकता असते. साफसफाईच्या प्रक्रियेत अनेकदा त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जाते, ज्यामुळे ती कोरडी होते. त्वचेला स्वच्छ केल्यानंतर भरपूर प्रमाणात नैसर्गिक मॉइश्चरायझर किंवा बदाम तेल लावा. त्यामुळे तुमच्या त्वचेला आराम मिळेल.
त्वचेला पुन्हा हायड्रेट करा -
होळीच्या कृत्रिम रंगांमुळे त्वचा कोरडी पडू शकते किंवा त्वचेला सूज येऊ शकते. होळीनंतर त्वचेला पुन्हा हायड्रेट करण्यासाठी सुखदायक कोरफडीचा जेल किंवा दही आणि मधाचा घरगुती मास्क हा एक उत्तम मार्ग आहे.
कोरफड जेल -
तुमची त्वचा पूर्णपणे स्वच्छ केल्यानंतर, ती कोरडी करा. तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर भरपूर प्रमाणात कोरफडीचे जेल लावा. ते तुमच्या त्वचेवर कमीत कमी 15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर धुवा. किंवा, तुम्ही 2 चमचे दही आणि 1 चमचा कच्चे मध मिसळून पेस्ट बनवू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावर, हातावर आणि मानेवर लावा. ते 20 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने धुवा.
खराब झालेल्या केसांसाठी हेअर मास्क -
होळीच्या वेळी केसांमध्ये मोठ्या प्रमाणात रंग जातो. त्यामुळे हे साफ करण्यासाठी प्रथम तुमचे केस पाण्याने धुवा जेणेकरून कोरडा रंग निघून जाईल. नंतर, सौम्य हर्बल शाम्पू वापरा आणि त्यानंतर कंडिशनर लावा. केस धुतल्यानंतर, केसांना पोषण देण्यासाठी आणि त्यांना निरोगी बनवण्यासाठी अंडी, दही किंवा आवळा पावडरपासून बनवलेला हेअर मास्क लावा.
तथापि, होळीच्या दिवशीही तुमच्या स्किनकेअर रूटीनचे पालन करायला विसरू नका. सकाळी उठल्यावर सर्वात आधी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. गुलाबपाणी किंवा कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करा आणि नंतर सौम्य क्लींजरने चेहरा धुवा. चेहऱ्यावर टोनर नक्की लावा. टोनर लावल्यानंतर, तुमचा चेहरा, मान, हात आणि पाय पूर्णपणे मॉइश्चरायझर करा.