Health Care Tips During Coronavirus: कोरोना काळात च्यवनप्राश, हळद दुधासहित या गोष्टींंचे रोज सेवन करा- केंद्रीय आरोग्य मंत्रालय
कोरोना काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा एकमेव उत्तम पर्याय आहे ज्याकरिता नेमकं काय करावंं यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिली आहे.
Coronavirus: देशात मागील 24 तासात 94,372 नवे कोरोना रुग्ण आढळुन आले आहेत ज्यामुळे एकुण कोरोनाबाधितांंची संंख्या 47,54,357 इतकी झाली आहे. परिणामी कोरोनाचा प्रकोप काही अजुनही थांंबलेला नाही असे म्हणता येईल. या संंकट काळात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणे हा एकमेव उत्तम पर्याय आहे ज्याकरिता नेमकं काय करावंं यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाने माहिती दिली आहे. आपल्यापैकी अनेकांंनी आतापर्यंत कोरोना काळात वेगवेगळ्या काढ्यांंचे सेवन करण्याबाबत सल्ले ऐकले असतील किंंबहुना करुन ही पाहिले असतील पण नेमकी कोणती पद्धत गुणकारी आहे याबाबत आरोग्य मंंत्रालयाने आज सविस्तर माहिती दिलीये, यासाठी Post COVID Management Protocol सांंगणारे पत्रक जारी करण्यात आले आहे, यामध्ये देण्यात आलेल्या सुचना सविस्तर जाणुन घेउयात...
Health Ministry Post COVID Management Protocol
- तुमच्या परिसरात कोरोना बाधित असो वा नसो, तुम्हाला लक्षणे असतील किंंवा नसतील तरीही घराबाहेर पडताना मास्क वापरायला विसरु नका.
- रोज सकाळ संध्याकाळ निदान 30 मिनिटांंचा वॉक करा, घरच्या घरीच केला तरी चालेल.
- कोणतेही औषध (आयुर्वेदिक सहित) डॉक्टरांंच्या सल्ल्याशिवाय घेऊ नका.
- प्राणायम करा.Health Tips: Quarantine च्या काळात 'अशा' पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात असावा समावेश, WHO ने केले मार्गदर्शन
कोरोना काळात आयुष मंंत्रालयाकडुन सांंगण्यात आलेल्या या आयुर्वेदिक गोष्टींंचे नियमित सेवन करणे फायद्याचे ठरु शकते,
-आयुष क्वठ (150 ml - 1 कप) रोज सकाळी.
- समश्मनी वटी (दिवसातुन दोन वेळा 500 mg)
- गिलॉय पावडर ( 1 ते 3 ग्राम) कोमट पाण्यातुन 15 दिवस घ्यावी
- अश्वगंधा पावडर (1 ते 3 ग्राम) कोमट पाण्यातुन दिवसातुन दोनदा 15 दिवस घ्यावी.
- रोज एक आवळा
- सुका खोकला असल्यास 1 ते 3 ग्राम मुलेठी पावडर कोमट पाण्यातुन घ्यावी
-हळद दुध (सकाळ/संध्याकाळ) एक पेला
-हळद आणि मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा.
- 1 टीस्पुन च्यवनप्राश नियमित घ्या
वरील दिलेल्या सुचना या कोरोना रिकव्हर रुग्णांनी तर आवर्जुन पाळायला हव्यात याशिवाय इतरांंनी सुद्धा खबरदारी साठी यांचे पालन करण्याचा सल्ला आरोग्य मंंत्रालयाने दिलेला आहे.