वजन कमी करताना तुमच्याकडून 'या' सामान्य चुका तर होत नाहीत ना?

लॉकडाउनच्या काळात जर बहुतांश जण वजन करण्याचा मागे लागले आहेत. वजन कमी होईल याच्या उत्साहाच्या भरात वर्कआउट करण्यासोबत डाएटचे सुद्धा पालन केले जात आहे

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

वजन कमी करण्याच्या प्रयत्नात काही वेळेस आपण काही आजारांना आमंत्रण देतो. लॉकडाउनच्या काळात जर बहुतांश जण वजन करण्याचा मागे लागले आहेत. वजन कमी होईल याच्या उत्साहाच्या भरात वर्कआउट करण्यासोबत डाएटचे सुद्धा पालन केले जात आहे. मात्र डाएट आणि वर्कआउट करुन सुद्धा तुमचे वजन कमी होत नाही आहे? यामागे विविध कारणे असू शकतात. दिवसभरात तुम्ही लहान मोठ्या चुका तर हमखास करत असालच त्यामुळेच तुम्हाला वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळा येत असेल. त्याचसोबत लोकांना भुक लागल्यानंतर काहीतरी चटपटीत आणि तेलकट खाण्याची इच्छा होते. परंतु लक्षात असू द्या चटपटीत आणि तेलकट पदार्थांमध्ये कॅलरी अधिक असल्याने वजन वेगाने वाढण्यास मदत होते.

वजन वाढण्यामागे काही कारण असू शकतात. परंतु त्यापासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या आरोग्यसंबंधित जीवनशैलीत बदलणे करणे महत्वाचे आहे. लोकांना जरी कमी दिवसात वजन कमी करायचे असेल तरीही आरोग्यासाठी वजन हे हळूहळूच कमी करणे योग्य पर्याय आहे. तर जाणून घ्या वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही 'या' काही सामान्य चुका तर नाही ना करत?(Lockdown मध्ये घरी बसून होतोय अपचनाचा त्रास; 'या' घरगुती उपायांनी चटकन मिळवा आराम)

- आपण दिवसातून तीन वेळा पोटभर खाणे करतो. याऐवजी 5 वेळा खाणे करा परंतु प्रत्येक वेळी कमी खाणे खा. संपूर्ण दिवसासाठी कॅलरीची वर्गवारी करुन खाण्याचा प्लॅन तयार करा. असे केल्याने अधिक खाण्यावर नियंत्रण राहू शकते.

-एका अभ्यासानुसार असे समोर आले आहे की, जे लोक मीट (Meat) खातात त्यांच्यामध्ये वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. बॉडी मास्क इंडेक्स (BMI) आणि शरीरातील फॅटचा स्तरसह पाहता हिरव्या पालेभाज्या कधीही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

-वजन कमी करण्यासोबत तुम्ही कोणता आहार घेतात हे सुद्धा महत्वाचे आहे. डाएट करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास उत्तम ठरेल. तसेच एकदमच डाएट करण्याकडे लक्ष देऊन खाणेपिणे कमी केल्यास तुम्ही आजारी सुद्धा पडू शकता.

वरील काही गोष्टी लक्षात घेता वजन करण्यासाठी तुमच्या कामी येतील. परंतु कोणत्याही प्रकारच्या वर्कआउट पूर्वी तो आपल्याला झेपेल की नाही याची सुद्धा खात्री करुन घ्या. लॉकडाउनच्या काळात वजन कमी करण्यासाठी तुम्ही विविध प्रयत्न करत असाल पण आरोग्याकडे सुद्धा तितकीच काळजी करा.