Health Benefits: हाडांची मजबुती ते उजळ त्वचा मिळवण्यासाठी बेस्ट आहे मसूर डाळ; जाणून घ्या फायदे

मसूर डाळ विविध प्रकारात आणि कमीत कमी वेळात शरीराला फायदेशीर ठरत असते, याचे काही असेच छुपे फायदे आज आपण जाणून घेऊयात..

Health Benefits Of Masoor Dal (Photo Credits: Youtube , File Image)

Health Benefits Of Masoor Dal: अलीकडच्या दगदगीच्या जीवनात अनेकदा स्वतःकडे लक्ष दयायला वेळ मिळत नाही, त्यामुळे मग शरीराच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही समस्या उद्भवतात, वास्तविक आता अशा प्रत्येक समस्येवर आपल्या सर्वांकडे हजार उपाय आहेत . पण हे उपाय करण्याची वेळ येण्याऐवजी आधीपासूनच आपल्या शरीराची नीट काळजी घेतली तर? अलीकडे डाएट च्या बाबतीत खूप काळजी घेऊनही काही बेसिक सत्व शरीराला मिळत नाहीत आणि परिणामी अनेक समस्या डोकं वर काढतात वरून खिशाला कात्री बसते ती वेगळीच. मात्र आज आपण एक असा सत्वांचा खजिना पाहणार आहोत ज्यासाठी तुम्हाला काही वेगळा खर्च करावा लागणार नाही उलट रोजच्या जेवणातच हा पदार्थ सामील करून तुम्ही असंख्य फायदे मिळवू शकाल. हा पदार्थ म्हणजे मसूर डाळ (Masoor Dal) .

मसूर डाळ ही साधारण शिजवून तिची आमटी करून खाल्ली जाते, अगदी झटपट बनणारा हा पदार्थ आहे जो अनेक घरांमध्ये अगदी एक दिवस आड सुद्धा बनवला जातो, यातील अक्खे मसुराची भाजी सुद्धा केली जाते तर याच  मसुर डाळीला भरडून  बनवली जाणारी पेस्ट हा सुद्धा त्वचेचासाठी एक चांगला स्क्रब असतो. एकूणच काय तर ही मसूर डाळ विविध प्रकारात आणि कमीत कमी वेळात शरीराला फायदेशीर ठरत असते, याचे काही असेच छुपे फायदे आज आपण जाणून घेऊयात..

मसूरच्या डाळीचे शरीराला फायदे

- मसूरच्या डाळी मध्ये फॉस्फरस असते जे कॅल्शियम सोबत मिळून हाडांची मजबुती वाढवण्यात मदत करते.

- मसूरच्या डाळीत असणाऱ्या व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुले डोळ्यांचे रोग दूर राहतात.

- शक्यतो वर्क आऊट नंतर मसुराची डाळ खाणे हे प्रोटीन मिळवण्यासाठी मदत करते.

- मसूर मधील कोलेजेन ही त्वचेची लवचिकता वाढवते त्यामुळे त्वचा टवटवीत दिसण्यास मदत होते.

-या डाळीतले तंतुमय पदार्थ बद्धकोष्ठ वर चांगला उपाय ठरतात. मसूर डाळ आहारात घेतल्यानंतर आतडय़ांची हालचाल वाढते.परिणामी मेटाबॉलिझम सुधारते.

- या डाळी मध्ये भूक भागवण्याची क्षमता असते, त्यामुळे अगदी बाऊलभर सूप सुद्धा पोटाला भरू शकते. अनेकदा म्ह्णून त्याचा डाएट मध्ये समावेश केला जातो. (हे ही वाचा- वजन कमी करण्याच्या स्पर्धेत 'हे' आहेत ट्रेंडिग डाएट)

- या डाळीतले ‘मॉलेब्डेनम’ हे द्रव्य शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करतात.

आता हे एवढे सर्व फायदे वाचून तुम्हीही आजपासूनच मसुराची डाळ आपल्या आहारात सामील करून घेण्याचा विचार करा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे. आपल्या डॉक्टरांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणे फायद्याचे ठरेल)