Health: झोप पूर्ण न झाल्यास आरोग्यावर होणारे परिणाम, 6 तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी घातक

निरोगी जीवन जगण्यासाठी प्रौढ व्यक्तीला दररोज साधारणत: सात ते आठ तास घेण्याची आवश्यकता असते.

रात्रीची शांत झोप photo credits: PIxabay

निरोगी जीवन जगण्यासाठी प्रौढ व्यक्तीला दररोज साधारणत: सात ते आठ तास घेण्याची आवश्यकता असते. पुरेश्या झोपेमुळे शरीराला आणि मेंदूला आराम मिळतो. कमी झोप घेतल्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

किती तास झोप आवश्यक आहे?

दररोज आठ तासांची झोप घ्यावी असे तज्ञ सांगतात. आणि वयानुसार तासांमध्ये बदल होतो.

कमी झोप घेण्याचे परिणाम:-

शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो

कॅन्सर आणि अल्झायमरसारखे आजार होण्याची शक्यता वाढते

कमी झोपेमुळे मधूमेह होण्याची शक्यता असते

कमी झोपेमुळे हृदयरोग होण्याची शक्यता असते.

कमी झोपेमुळे कोणत्याही कामात लक्ष केंद्रित होत नाही.

वजन जास्त वाढते.

शरीरातलं ग्रेलिन हार्मोनचं प्रमाण वाढतं

जास्त आजारी पडतात

झोप पूर्ण न झाल्यास डोळ्यावर सुद्धा परिणाम होतो.

झोप न झाल्यास ताणतणाव, रागीटपणा, चिडचिडेपणा दिसून येतो.

हायपरटेंशनची समस्या निर्माण होते

 

अनेक लोक कमी झोपेमुळे विविध प्रकारच्या आजाराने त्रस्त आहेत. कमी झोप आणि तणाव यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी झोप घ्या आणि निरोगी राहा