Happy Ramadan Eid 2020: रमजान ईद मराठी शुभेच्छा, Wallpapers, Messages, HD Images च्या माध्यमातून मुस्लिम बांधवांना द्या आज Eid-al-Fitr च्या शुभेच्छा!
आज भारतामध्ये साजरी केल्या जाणार्या रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांना, मित्र मैत्रिणींना, प्रियजनांना ईदच्या शुभेच्छा देऊन खास करा त्यांचा आजचा दिवस
Eid Mubarak 2020 HD Images and Greetings: आज 25 मे दिवशी भारतामध्ये यंदाची ईद साजरी केली जात आहे. जगभरात ईद (Ramadan Eid ) चा सण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. इस्लामिक दिनदर्शिकेनुसार 10 व्या महिन्यात शव्वाल चंद्रासह रमजानचा पाक महिना संपतो असे मानले जाते. जगभरातील मुस्लिम बांधव शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज सर्वत्र ईदीचा सण साजरा करण्यात येणार आहे. या ईद सणाला ईद-अल-फितर (Eid-al-Fitr), ईद-उल-फितर (Eid-ul-Fitr) आणि मीठी ईद (Meethi Eid) असे ही म्हटले जाते. ईदच्या दिवशी सकाळी लोक मस्जिद मध्ये जाऊन नमाज अदा करतात. त्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेत ईद सणाच्या शुभेच्छा देतात. ईदच्या सणाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी शीर खुरमा सारखे अन्य काही स्वादिष्ट पदार्थ घरात बनवले जातात. लहान मुलांना ईदी आणि गरीबांना जकात दिले जाते. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मुस्लिम बांधवांना ईदीचा सण धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही आहे. Eid Mubarak 2020 Wishes: रमजान ईद च्या शुभेच्छा मराठी Messages, GIF Images, WhatsApp Stickers, Facebook Greetings च्या माध्यमातून शेअर करून 'ईद उल फितर' चा सण करा स्पेशल!
रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी शव्वालचा चंद्र दिसून आल्यानंतर एकमेकांना चांद रातच्या शुभेच्छा देतात. त्यामुळे यंदाच्या रमजान ईद सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी WhatsApp Stickers, Quotes, Wallpapers, GIFs, Messages च्या माध्यमातून नातेवाईंकासह मित्रपरिवाराला द्या शुभेच्छा!(Easy and Quick Mehndi Designs For Eid al-Fitr 2020: ईद उल-फित्र महोत्सवासाठी 'हे' आयडिया वापरून आपल्या हातांवर झटपटबनवामेहंदी ब्रेसलेट पैटर्न (Watch Video Tutorials)
इस्लामित धर्मांच्या मान्यतांनुसार, रमजान महिना पवित्र मानला जातो. या दिवसात अल्लाह स्वर्गाचे दरवाजे खुले करतो आणि प्रत्येका इच्छा पूर्ण करतो असे मानले जाते. या महिन्यात जगभरातील प्रत्येक मुस्लिम बांधव रोजा ठेवत आपल्या गुन्हांची माफी मागतात. रमजानच्या महिन्यात आपल्या इच्छा पूर्ण होतात असे म्हटले जाते. रमजानच्या दिवसात कुराणचे पठण करणे आणि 5 वेळा नमाज अदा करणे महत्वपूर्ण मानले जाते.