Vegetarian and Non-Vegetarian Thalis Prices Drop: ग्राहकांना दिलासा! ऑगस्ट 2024 मध्ये शाकाहारी-मांसाहारी थाळीच्या किंमतीमध्ये अनुक्रमे 8 व 12 टक्क्यांनी घट- CRISIL

अहवालात असे म्हटले आहे की, मांसाहारी थाळीच्या किमतीत घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे देशातील ब्रॉयलर चिकनच्या किमतीत वर्षभराच्या तुलनेत 13 टक्क्यांनी झालेली घट.

शाकाहारी थाळी (Photo: Maharaja Bhog)

Vegetarian and Non-Vegetarian Thalis Prices Drop: किरकोळ महागाई (Inflation) कमी झाल्याचा परिणाम आमच्या जेवणाच्या ताटांवरही दिसून येत आहे. अलीकडील अहवालात असे दिसून आले आहे की, ऑगस्ट महिन्यात शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या (Vegetarian and Non-Vegetarian Thalis) किमती कमी झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात व्हेज आणि नॉनव्हेज थाळीच्या किमती या वर्षीच्या तुलनेत जास्त होत्या. शाकाहारी थाळीची किंमत यंदाच्या ऑगस्टमध्ये (वार्षिक आधारावर) 8% ने घसरून 31.2 रुपये झाली. गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये व्हेज थाळीची किंमत 34 रुपये होती. दुसरीकडे, मांसाहारी थाळीमध्ये 12 टक्के घट झाली आहे.

क्रिसिलने शुक्रवारी जारी केलेल्या फूड प्लेट कॉस्ट मंथली इंडिकेटरमध्ये ही माहिती दिली. व्हेज थाळीच्या किमती कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे टोमॅटोच्या किमतीत 51 टक्के कपात, हे आह्रे. ऑगस्टमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत टोमॅटोचा वाटा 12 टक्के होता. टोमॅटो किंमत ऑगस्ट 2023 मधील 102 रुपये प्रति किलोवरून ऑगस्ट 2024 मध्ये 50 रुपये प्रति किलो झाली. दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील राज्यांमधून ताज्या मालाची आवक झाल्यामुळे ही टंचाई निर्माण झाली होती.

थाळीच्या किमती कमी होण्याचे दुसरे प्रमुख कारण म्हणजे एलपीजीच्या किमतीत 27 टक्के कपात. दिल्लीतील एलपीजी सिलेंडरची किंमत ऑगस्ट 2023 मध्ये 1,103 रुपयांवरून, मार्च 2024 मध्ये 803 रुपयांपर्यंत कमी झाली. एलपीजीच्या दरात घट झाल्याने थाळीच्या किमतीत घट झाली आहे. ऑगस्ट 2024 मध्ये, थाळीच्या किमतीमध्ये घट होण्याचे अजून एक कारण म्हणजे, वनस्पती तेल, मिरची आणि जिरे यांच्या किमतीमध्ये अनुक्रमे 6 टक्के, 30 टक्के आणि 58 टक्के झालेली घट.  झाली आहे. या घटकांचा शाकाहारी थाळीच्या किमतीच्या 5 टक्के वाटा आहे. (हेही वाचा: India's Biggest Thali: अभिनेता Sonu Sood च्या नावावर सादर झाली भारतातील सर्वात मोठी थाळी; एकावेळी 20 लोक एकत्र जेवू शकतात)

मांसाहारी थाळीच्या किमती घसरण्याचे कारण म्हणजे ऑगस्टमध्ये श्रावण महिन्यामुळे मांसाचा वापर कमी झाला आहे. या काळात ब्रॉयलर चिकनच्या दरात 1 ते 3 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. अहवालानुसार, मासिक आधारावर व्हेज थाळीच्या किमतीत 4 टक्क्यांनी घट झाली, तर त्याच काळात मांसाहारी थाळीच्या किमतीत 3 टक्क्यांनी घट झाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif