Turkish Coffee Viral Video: तुर्की कॉफी बनवतानाचा कुतूहलजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, तुम्ही पाहिलात?

पण तुर्की कॉफी? (Turkish coffee) काहीच लोकांनी ऐकली असेल कदाचित. इथे आम्ही तुर्की कॉफी बनवितानाचा एक व्हिडिओ देत आहोत. जो पाहून कदाचित आपल्यालाही कॉफी पिण्याची इच्छा होऊ शकते. या व्हिडिओने अनेकांना प्रभावीत केले आहे.

Turkish Coffee | (Photo Credit - Twitter)

कॉफी (Coffee), एक असे पेय जे जगभरातील लोक पसंत करतात. जगभरातील विविध देशांतील प्रदेश आणि रुढी परंपरा, चव आणि स्वादानुसार हे पेय बनविण्याच्या आणि पिण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या. सोशल मीडियावर या पद्धीतींपैकीच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तुर्की कॉफी व्हिडिओ (Turkish Coffee Video) असे या व्हिडिओबद्दल सांगितले जात आहे. आजवर अनेकांनी तुर्की आईस्क्रीमबद्दल (Battered ice cream) ऐकले असेल. पण तुर्की कॉफी? (Turkish coffee) काहीच लोकांनी ऐकली असेल कदाचित. इथे आम्ही तुर्की कॉफी बनवितानाचा एक व्हिडिओ देत आहोत. जो पाहून कदाचित आपल्यालाही कॉफी पिण्याची इच्छा होऊ शकते. या व्हिडिओने अनेकांना प्रभावीत केले आहे.

तुर्की आईस्क्रीम विक्रेत्यांकडून ग्राहकांसोबत केली जाणारी हलकीफुलकी मजा आपण सर्वांनीच पाहिली असेल. त्याचे खूप सारे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. आपणही ते पाहिले असाल. पण आता असाच परंतू काहीसा वेगळा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो तुर्की कॉफीचा आहे. ज्या व्हिडिओवर नेटीझन्स चांगलेच फिदा झाले आहेत. (हेही वाचा, World Heart Day 2021: कॉफी, Sexआणि Migraine बाबत सावधान, या १० गोष्टी ठरु शकतात हृदयविकार आजाराचे कारण)

तुर्कीमध्ये कॉफी पिण्याची शतकांपासूनची परंपरा आहे. अरेपिक बीन्सचा वापर करुन आणि त्यात थोडी साखर मिसळून येथे कॉफी बनवली जाते. विशेष म्हणजे ही कॉफी 'सेझवे' (Cezve) किंवा मद्यनिर्मिती केली जाते त्या विशेष भांड्यात (Special Brewing Vessel) बनवली जाते.

व्हि़डिओ

तुर्की कॉफी शक्यता शेकडी, स्टोव्ह किंवा तत्सम चुलीवर अग्नीच्या मंद आचेवर तयार केली जाते. या व्हिडिओमध्ये तर तुम्ही कॉफी बनविण्याचा एक वेगळाच अंदाज पाहू शकता. व्हिडिओत आपण पाहू शकता की, गरम वाळूचा वापर करुन एक अत्यंत स्वादिष्ट आणि चवदार पेय तयार केले जात आहे. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. पेय दुसरे तिसरे काही नसून तुर्की कॉफीच आहे. तुर्की कॉफी किंवा 'सेझवे' तयार करण्यासाठीचे भांडे पाणी आणि कॉफीने भरलेले होते. हे भांडे (सेझवे) गरम झालेल्या वाळूवर सहजतेने सरकवले असता वाळूतील उष्णतेमुळे भांड्यातील पाणी उकळते. परिणामी कॉफी लगेच तयार होते.

व्हिडिओ

तुर्की कॉफी बनवितानाचा हा अवख्या 15 ते 17 सेकंदाचा व्हिडिओ @fasc1nate नावाच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करण्यात आल्यापासून हा व्हिडिओला आतापर्यंत 6.7 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 68k लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ पाहताना अनेकांना आश्चर्य वाटते आहे की, कॉफी उकळण्याइतकी वाळू इतकी गरम कशी झाली.