5 Best Sprouts Dishes: पौष्टिक आहार, कोणत्याही ऋतूमध्ये चालणारे कडधान्यापासून बनवलेले 5 सोपे पदार्थ; घ्या जाणून

होय, इथे आम्ही देत आहोत कडधान्यापासून बनवलेले 5 सोपे पदार्थ (Sprouts Recipe).

Easy Recipes Tips | (Photo Credit : ANI)

Easy Recipes Tips: तुम्ही पौष्टीक आहाराच्या शोधात असाल आणि तुम्हाला कोणत्याही ऋतुमध्ये चालणारे पदार्थ जाणून घ्यायचे असतील तर, ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. होय, इथे आम्ही देत आहोत कडधान्यापासून बनवलेले 5 सोपे पदार्थ (Sprouts Recipe). जे आहेत शरीरासाठी पौष्टीक आणि बनवायलाही अत्यंत सोपे, आरोग्यदाई आणि कमी वेळात तयार होणारे. कडधान्य म्हणजेच स्प्राउट्सपासून तयार होणारे हे पदार्थ तुमच्या शरीराला आवश्यक पोषणतत्व देण्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच घ्या जाणून पाच सोप्या रेसीपीज.

स्प्राउट सॅलड

आवश्यक घटक- टोमॅटो, काकडी आणि भोपळी मिरची, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल, मीठ आणि मिरपूड (हेही वाचा, National Raisin Day: मनुका नियमित खाल्याने होतो आरोग्याला फायदा, दूर होतील 'या' समस्या, जाणून घ्या)

पाककृती: टोमॅटो, काकडी आणि मिरची बारीक कापून घ्या. त्यावर आवश्यकतेनुसार लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड टाका. तुमच्या इच्छेनुसार डीश सजवा आणि ताव मारायला सुरुवात करा.

क्विक स्प्राउट सँडविच

आवश्यक घटक- स्प्राउट्स, स्लाइस केलेले एवोकॅडो, ग्रीक दही आणि ब्रेड

पाककृती: स्प्राउट्स आणि दही ब्रेडवर लावून घ्या, त्याच्या छोट्या स्लाईस बनवा आणि खायला सुरु करा. (हेही वाचा, Best Stews In The World: भारतातील कीमा, दाल तडका, शाही पनीर, मिसळसह 9 पदार्थ जगातील टॉप डिशेसमध्ये समाविष्ट; पहा जगातील सर्वोत्कृष्ट 'स्टू'जची यादी (View Post))

स्प्राउट स्टिर-फ्राय

आवश्यक घटक- लसूण, आले, भोपळी मिरची, गाजर, ब्रोकोली आणि तुमच्या आवडत्या भाज्या, थोडे तेल

पाककृती: लसूण, आले आणि भोपळी मिरची, गाजर आणि ब्रोकोली यांसारख्या तुमच्या आवडत्या भाज्यांसह तेलात परतून घ्या. अतिरिक्त चवसाठी सोया सॉस आणि तिळाचे तेल घाला आणि डिश छानशी सजवून खायला घ्या.

Healthy Sprout Wrap

Healthy Sprout Wrap हा एक जेवनाचा पोर्टेबल प्रकार आहे. ज्यामध्ये स्प्राउट्स, किसलेले चीज, टोमॅटोचे तुकडे गुंडाळी (चपाती किंवा तत्सम पदार्थांमध्ये) करुन एकत्र केले जातात. ही रेसीपी अत्यंत कमी वेळात अधिक दमदार आहार देणारी म्हणून ओळखली जाते.

स्प्राउट सूप

आवश्यक घटक- कांदा, लसूण, भाजीपाला, मटनाचा रस्सा (असेल तर), स्प्राऊट्स

पाककृती: उकळलेल्या रस्स्यामध्ये स्प्राऊट्स आणि कांदा, लसून टाकून त्याचे छान मिश्रण तयार करा. हे मिश्रण आपण चपाती, ब्रेड यांसोबत खाऊ शकतो. काही लोक याला मिसळ असेही म्हणतात.

शरीरास अपायकारक किंवा गुणवत्ता नसलेल्या कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्यापेक्षा दमदार आणि पौष्टीक आहार घेणे आरोग्यासाठी केव्हाही हितकारक मानले जाते. त्यामुळे आपणही घरच्या घरी स्प्राऊट्सपासून बनविलेले दमदार पदार्थ खाऊन आपली भूक भागवू शकता. खास करुन या रेसीपी कमी वेळामध्ये चांगले पदार्थ बनविण्यासाठी कामी येऊ शकतात.