Narali Purnima 2020 Recipes: नारळी पौर्णिमा निमित्त नारळी भात, वड्या, खोबऱ्या पासून बनवा 'या' खास रेसिपीज; Watch Video
येत्या 3 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की, दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो. याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव सोने किंवा चांदीचा नारळ अर्पण करतात.
Narali Purnima 2020 Recipes: भारतात कोणत्याही सणाला वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. येत्या 3 ऑगस्टला नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जाणार आहे. श्रावण महिन्यात पावसाचा जोर ओसरू लागला की, दोन महिने बंद असलेला मच्छिमारीचा धंदा पुन्हा सुरु होतो. याआधी समुद्राला नारळ अर्पण करण्याची पद्धत म्हणून नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जातो. या दिवशी कोळी बांधव सोने किंवा चांदीचा नारळ अर्पण करतात.
या निमित्ताने पारंपरिक गाणी नृत्य करून धमाल केली जाते. या सणानिमित्त नारळापासून बनणारे काही खास पदार्थ बनवले जातात. नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्ही नारळी भात, वड्या, खोबऱ्या पासून काही खास रेसिपी बनवू शकता. चला तर मग जाणून घेऊयात खास रेसिपीज...(हेही वाचा - वजन घटवणे ते मधुमेह कंट्रोल करणे, बेसनच्या पोळ्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल थक्क; पहा हेल्थी रेसिपी (Watch Video))
नारळी भात -
नारळ्याच्या वड्या -
ओल्या नारळाचे लाडू -
रवा नारळ बर्फी -
नारळाची खीर -
कोळी लोकांसाठी नारळी पौर्णिमा हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात.