India's Food Service Sector: भारताचे अन्न सेवा क्षेत्र 2027-28 पर्यंत 8.1 टक्क्यांनी वाढून 7.76 लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा; कोविडनंतर बाहेर खाण्याचा ट्रेंड वाढला- Reports
याचा अर्थ जवळपास प्रत्येक वीकेंडला (शनिवार-रविवार) मुंबईकर एकतर बाहेर जेवण करत आहेत.
India's Food Service Sector: आर्थिक वर्ष 2027-28 पर्यंत भारताचे अन्न सेवा क्षेत्र (Food Service Sector) 8.1 टक्क्यांनी वाढून, 7.76 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. 2023-2024 मध्ये ते 5.69 लाख कोटी रुपये होते. नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशनने मंगळवारी ही माहिती दिली. अशाप्रकारे भारताचे अन्न सेवा क्षेत्र येत्या काही वर्षात महत्त्वपूर्ण परिवर्तनासाठी सज्ज आहे. आपल्या इंडिया फूड सर्व्हिसेस रिपोर्ट-2024 मध्ये, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन (NRAI) ने म्हटले आहे की 2027-28 पर्यंत 13.2 टक्के चक्रवृद्धी वार्षिक वृद्धी दराने (CAGR) अन्न सेवा क्षेत्राचा संघटित भाग वाढण्याचा अंदाज आहे.
कोविड-19 महामारीच्या धक्क्यातून हे क्षेत्र सावरले आहे. कोविडदरम्यान ते 2019-20 या आर्थिक वर्षातील 4.24 लाख कोटी रुपयांवरून, 2020-21 मध्ये 2 लाख कोटी रुपयांवर घसरले होते. हे 2021-22 मध्ये 4.72 लाख कोटी रुपये, 2022-23 मध्ये 5.3 लाख कोटी रुपये आणि 2023-24 मध्ये 5.69 लाख कोटी रुपये होईल.
अहवालानुसार, 2024-25 मध्ये या क्षेत्राचा आकार 6.13 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2028 पर्यंत भारत जपानला मागे टाकून तिसरी सर्वात मोठी अन्न सेवा बाजारपेठ बनणार आहे. अमेरिका ही सर्वात मोठी जागतिक बाजारपेठ आहे. भारताच्या जीडीपीमध्ये अन्न सेवा क्षेत्राचे योगदान सध्या 1.9 टक्के आहे. अन्न सेवा क्षेत्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे नियोक्ते आहे. सध्या 8.5 दशलक्ष लोकांना हे क्षेत्र रोजगार देते. 2028 पर्यंत ही संख्या 20 टक्क्यांनी वाढून 10.3 दशलक्षांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
अभ्यासानुसार, फास्ट-फूड चेन आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या वाढीसह भारताच्या अन्न सेवा बाजारपेठेत गेल्या दशकात लक्षणीय बदल झाले आहेत. भारतात महिन्यातून पाच वेळा बाहेर खाण्याची वारंवारता तुलनेने कमी असली तरी, यूएस आणि चीन सारख्या विकसित बाजारपेठेतील ट्रेंड प्रमाणेच बाहेर खाणे हे केवळ विशेष प्रसंगी नाही तर, सोयी-आधारित क्रियाकलाप बनत आहे. (हेही वाचा: Rakul Preet Singh’s Brother Aman Arrested: रकुल प्रीत सिंगचा भाऊ अमन प्रीत सिंगला ड्रग्ज प्रकरणात अटक, हैदराबाद पोलीस करणार चौकशी)
दरम्यान, अहवालानुसार, मुंबईकरांची दर महिन्याला बाहेर खाण्याची सरासरी वारंवारता 7.92 पट आहे, ज्याचा मोठा वाटा ऑनलाइन ऑर्डरद्वारे येतो. याचा अर्थ जवळपास प्रत्येक वीकेंडला (शनिवार-रविवार) मुंबईकर एकतर बाहेर जेवण करत आहेत किंवा ऑर्डर देत आहेत. त्याचप्रमाणे, ते जेवणासाठी दरडोई 877 रुपये खर्च करत आहेत.