बेंगळूरूत सुरू झालं भारतातील पहिलं 'स्काय डायनिंग रेस्ट्रॉरंट, 160 फूट उंचावर घेता येणार जेवणाचा आनंद
जमिनीपासून 160 फूट उंचावर आकाशात एक खास हॉटेल सुरू करण्यात आले आहे.
तुम्ही खवय्ये आणि साहसी वृत्तीचे असाल तर तुमची पुढची ट्रीप बेंगळूरूला नक्की प्लॅन करा. बेंगळूरूमध्ये भारतातील पहिला 'स्काय डायनिंग'चा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जमिनीपासून 160 फूट उंचावर आकाशात एक खास हॉटेल सुरू करण्यात आले आहे. हवेतल्या या तरंगत्या हॉटेलमधून बेंगळूरूच्या नागवरा लेक आणि आजुबाजूच्या परिसराचा आनंद घेता येतो.
कसं आहे तरंगतं हॉटेल ?
जमिनीपासून 160 फीट उंचावर असलेल्या हॉटेलमध्ये 22 आसन क्षमता आहे. भारतापूर्वी 65 देशांमध्ये फ्लाय डायनिंगच्या स्वरूपात हॉटेल आहे.
सुरक्षेची पुरेशी काळजी
acrophobia असणार्या लोकांसाठी ही हवेतील हे तरंगत हॉटेल अगदीच सुरक्षित आहे. या डायनिंगमध्ये बसताना तीन सेफ्टी बेल्ट तुमची सुरक्षा करते. वजनाची मर्यादा नाही मात्र उंची किमान 4-5 फूट असणं आवश्यक आहे. 14 वर्षांखालील आणि गरोदर स्त्रियांना काही सुरक्षेच्या कारणास्तव येथे प्रवेश दिला जात नाही.
हॉटेल संपूर्ण काचांनी झाकलेलं असल्याने अगदी पावसाळ्यातही त्याचा आनंद घेता येऊ शकतो.
झोमॅटोसरख्या फूड सर्व्हिसिंग अॅपमध्ये या रेस्टॉरंटचं टेबल बुकिंग करता येऊ शकतं. साधारण दोन व्यक्तीसाठी येथे 8,000 रूपये मोजावे लागतात.