Ice Cream Dosa Viral Video: मसाला आईस्क्रीम डोसा, खाणार की फक्त व्हिडिओ पाहणार?
धक्कादायक म्हणजे तव्यावरुन काढलेल्या गरमागरम डोशाचा छान कोन बनवून त्यात चक्क घट्ट आणि थंड आईसक्रीम भरले आहे. अर्थात ही काहीशी विचीत्र रेसिपी कोणाला आवडली आणि त्याची चवही कोणी चाखली याबाबत माहिती नाही. पण, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि आवडल्यास ही रेसीपी नक्की ट्रायही करु शकता.
Dosa Ice Cream Viral Video: आईसक्रीम आणि डोसा हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ. यातील पहिला पदार्थ थंड असताना आणि दुसरा गरम असतानाच खाण्यातच खरी मजा. पण गंमत अशी की परस्परविरोधी गुणधर्माचे हे दोन्ही पदार्थ जर कोणी एकत्र खाल्ले तर? ऐकूणच कसेतरी वाटते ना? पण स्वत:ला सावरा. इथे दिलेल्या व्हिडओत आपणास असेच काहीसे पाहायला मिळणार आहे. स्पष्टच सांगायचे तर व्हिडिओत एका व्यक्तीने चक्क मसाला डोसा आईसक्रीम (Ice Cream Dosa Viral Vide) बनवले आहे. धक्कादायक म्हणजे तव्यावरुन काढलेल्या गरमागरम डोशाचा छान कोन बनवून त्यात चक्क घट्ट आणि थंड आईसक्रीम भरले आहे. अर्थात ही काहीशी विचीत्र रेसिपी कोणाला आवडली आणि त्याची चवही कोणी चाखली याबाबत माहिती नाही. पण, तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता आणि आवडल्यास ही रेसीपी नक्की ट्रायही करु शकता.
आपण आतापर्यंत आईसक्रीमचे वेगवेगळे प्रकार पाहिले असतील. त्यातील अनेक प्रकार कदाचित आपल्याला आवडतही असतील. पण या आईसक्रीममधील एक साम्य महत्त्वाचे. ते म्हणजे भलेही फ्लेवर्स वेगवेगळे असतील ते सर्व थंडच आढळतील. डोशाचेही तसेच काहीसे. साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा, चॉकलेट डोसा असे डोशाचे एक ना अनेक पदार्थ आपण खाले, अनुभवले असतील. पण त्यातही एक साम्य असे की, डोसा हा गरमच असतो. थोड्या वेळाने तो थंड होतो ही बाब वेगळी. पण त्याची निर्मीती होते तेव्हा तो गरम असतो. पण व्हिडिओतील कृती पाहाल तर दोन्ही परस्पर विरोधी गुणधर्माचे पदार्थ एकत्र येऊन भलताच पदार्थ बनवला जातो आहे.
ट्विट
मसाला डोसा आईस्रीम किंवा आईसक्रीम डोसा कसा बनतो हे आपण व्हायरल व्हिडओमध्ये पाहू शकता. एक शेफ आपल्या तव्यावर मस्तपैकी छान असा कुरकुरीत डोसा बनवतो आहे. डोसा छान बनला की त्या डोशापासून तो एक छान कोन बनवतो. जोकी आईस्क्रीमसारखा दिसतो. हा पठ्ठा कोण बनवूनच थांबत नाही. त्याउलट तो या कोणमध्ये खरोखरच आईस्क्रीम भरतो आणि वरुण त्यावर चॉकलेटचे छोटे छोटे बारीक असे तुकडेही टाकतो. आईस्क्रीम डोसा बनवतानाचा हा व्हिडिओ आतापर्यंत लक्षवधी लोकांनी पाहिला आहे. तर 1445 लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.