नवरात्रोत्सव 2018 : अशी बनवा रताळ्याची बर्फी !
पण रताळ्याची बर्फी तुम्ही कधी ट्राय केलीय का?
उपवासासाठी हमखास वापरणारा पदार्थ म्हणजे रताळं. रताळं भाजून, उकडून खालं जातं. पण रताळ्याची बर्फी तुम्ही कधी ट्राय केलीय का? मग उपवासासाठी हा हटके पदार्थ नक्की ट्राय करुन पाहा.... उपवास करण्याचे '5' आरोग्यदायी फायदे ! तुम्हाला ठाऊक आहेत का?
साहित्य
- रताळी- 400 ग्रॅम
- डेसकेटेट कोकोनट- 2 चमचे
- कंडेन्स मिल्क- 5-6 चमचे
- साजूक तूप- 1 चमचा
- वेलची पावडर - 1 चमचा
- बदामाची पूड - 1 चमचा
कृती
# रताळे हे कंदमूळ असल्याने त्यावर अतिप्रमाणात माती असते. त्यामुळे स्वच्छ धुवून घेतल्यानंतरच प्रेशरकुकरमध्ये शिजवावे.
# स्वच्छ धुतलेले रताळे शिजवल्यानंतर त्याची सालं काढून स्मॅश करा.
# नॉनस्टीकच्या पॅनवर साजूक तूप घालून थोडे गरम करा.
# त्यावर स्मॅश केलेले रताळे परता. त्याचा रंग थोडा बदल्यानंतर गॅस मंद करा.
# रताळ्याच्या मिश्रणामध्ये कंडेन्स मिल्क मिसळून मिश्रण एकजीव करा.
# त्यावर डेसिनेटेड कोकोनट मिसळा. त्यानंतर मिश्रण पुन्हा नीट हलवून काही वेळ शिजवा.
# हे मिश्रण थोडे थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.
# त्यामध्ये वेलची पूड मिसळा.
# त्यानंतर मायक्रोव्हेवच्या डिशमध्ये हे मिश्रण थापून किमान 30 मिनिटे शिजवा.
# त्यावर बदामाच्या पूडची सजावट करा आणि थोडे थंड झाल्यावर काप काढून थंड बर्फी खाण्यासाठी तयार करा. उपवासाला असे बनवा साबुदाण्याचे स्प्रिंग रोल्स !