Restaurant Bill Viral: हॉटेलचे 1985 मधील बिल व्हायरल, किंमत पाहून नेटीझन्स थक्क, म्हणाले 'अरेच्चा! इतके कमी?'

कधी हटके व्हिडिओ, कधी फोटो तर कधी भलतेच काही. आताही सोशल मीडियावर चक्क एक रेस्टॉरंट बिल व्हायरल (Restaurant Bill Viral) झाले आहे. जे 1985 सालातले आहे. हे बिल सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यावरील पदार्थांच्या किमती.

Restaurant Bill | Representational Image (Photo Credits: Archived, Edited, Symbolic Images)

सोशल मीडियावर (Social Media) कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. कधी हटके व्हिडिओ, कधी फोटो तर कधी भलतेच काही. आताही सोशल मीडियावर चक्क एक रेस्टॉरंट बिल व्हायरल (Restaurant Bill Viral) झाले आहे. जे 1985 सालातले आहे. हे बिल सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यावरील पदार्थांच्या किमती. या किमती पाहून सोशल मीडियावर अनेकांना धक्का बसला आहे. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारला आहे, अरेच्चा! इतके कमी?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बिलानुसार शाही पनीरची किंमत फक्त 8 रुपये आणि दाल मखनी 10 रुपयांपेक्षाही कमी असल्याचे दिसते. हे दरपत्रक फार जुन्या काळातीलही नाही बरं.. हे आहे केवळ 40 वर्षे जुने. दिल्लीतील एका रेस्टॉरंटने 1985 चे हे बिल सोशल मीडियावर शेअर केले आहे. बिल पाहून बऱ्याच नेटिझन्सला धक्का बसला आहे. (हेही वाचा, Green Chilli Pickle Recipe: हिरव्या मिरचीचे लोणचे रेसिपी; व्हिडिओ पाहा, मिळतील अनेक टीप्स)

खरेतर हे बील 12 ऑगस्ट 2013 रोजी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टसोबत जोडण्यात आले होते. जे आता पुन्हा व्हायरल झाले आहे. दिल्लीतील लाजपत नगर भागातील लझीज रेस्टॉरंट अँड हॉटेल या रेस्टॉरंटने 20 डिसेंबर 1985 रोजी काही ऑर्डर घेतल्या होत्या. या ऑर्डरचे आकारलेले हे बिल आहे. बिलावरील पदार्थांवर नजर टाकता ग्राहकाने शाही पनीर, दाल मखनी, रायता आणि काही चपात्या ऑर्डर केल्या होत्या.

ट्विट

बिलावर पाहायला मिळते की, पहिल्या दोन पदार्थांसाठी अनुक्रमे 8 रुपये, इतर दोन पदार्थांसाठी 5 रुपये आणि 6 रुपये किंमत होती. या सर्व वस्तूंच्या बदल्यात ग्राहकांना फक्त 26 रुपये मोजावे लागले. आता बिलाच्या कमी किमतीवर नेटिझन्स प्रतिक्रिया देत आहेत. बिल पाहून एका युजरने लिहिले की, "गेले ते दिवस." दुसऱ्या युजरने लिहिले, "आहा! वो दिन भी क्या दिन थे"