Christmas Cake Ideas: यंदा नाताळला नेहमीच्या रम केक सोबतच Dates ते Honey Cake च्या हटके रेसिपीज घरच्या घरी ट्राय करून द्विगुणित करा ख्रिसमसचा आनंद! (Watch Video)
ख्रिसमस स्पेशल केक बनवण्यासाठी यंदा रम केक सोबतच आरोग्यदायी आणि झटपट बनणाऱ्या खजूर, गाजर आणि हनी केक या फ्लेव्हर्सचा सुद्धा नक्की विचार करा.
Christmas 2019: खाऊन पिऊन सण साजरे करणे ही जणू काही भारताची परंपराच आहे. त्याच न्यायाने आता काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या ख्रिसमसच्या निमित्ताने एखादी मेजवानी आयोजित करण्याचा प्लॅन अनेकांनी केला असेल, दरवर्षी ख्रिसमस सेलिब्रेशनची जान ठरणारा एक पदार्थ म्हणजे केक. प्रभू येशूच्या (Lord Jejus) जन्मदिनाच्या नाताळ सोहळ्याला मुख्यतः रम (Rum Cake) किंवा प्लम केक (Plum Cake) बनवला जातो, रम मध्ये सुका मेवा भिजवून बनवला जाणारा हा केक नाताळची ओळखच ठरला आहे. पण यंदा जर का तुम्ही या पारंपरिक पदार्थात थोडा ट्विस्ट आणून नवे काहीतरी ट्राय करू इच्छित असाल तर आम्ही आपल्याला काही हटके फ्लेव्हर्स सुचवणार आहोत. अगदी फार मेहनत न घेता तुमची क्रिएटिव्हिटी दाखवायला या रेसिपी उत्तम पर्याय ठरतील... काय मग वाट कसली पाहताय चला तर मग पाहुयात कसे बनवायचे ख्रिसमस स्पेशल केक.. Christsmas 2019 Special Easy Recipes: स्पॉंज केक, कुकीज पासुन ते टेस्टी डोनट पर्यंत यंदा 'या' सोप्प्या रेसिपी ट्राय करुन वाढ्वा ख़्रिसमसची शान (Watch Video)
सर्वांच्या घरी ओव्हन असेलच असे नाही पण म्ह्णून तुमची केक खाण्याची इच्छा मारून टाकणे पण गरजेचे नाही आम्ही या लेखातून तुम्हला ओव्हन शिवाय कुकर मध्ये तसेच तावयवर बनणारे केक दाखवणार आहोत.
खजूर केक
खजूर केक हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा पदार्थ ठरेल, तसेच तुम्ही जर का शाकाहारी मित्रांना पार्टीसाठी बोलवणार असाल तर त्यांना देखील या पदार्थाचा आस्वाद अगदी निश्चिन्त घेता येईल.
गाजर केक
गाजराचा खुलून येणारा लाल रंग हा ख्रिस्तमस थीम ला अगदी साजेसा ठरेल, त्या सोबतच गाजराचे आरोग्यदायी फायदे नव्याने सांगयची गरज नाहीच हो ना? Christmas 2019: नाताळ सण साजरा करण्यामागची 'ही' कथा तुम्हाला माहित आहे का?
हनी केक
केक सारखा पदार्थ म्हंटला की डाएटिंग करणाऱ्यांच्या मनाला चांगलाच धक्का बसतो. पण यामध्ये साखरेऐवजी जर का तुम्ही हनी म्हणजेच मधाचा वापर केलात तर अतिगोड खाल्ल्याने होणारी हानी नक्कीच टाळता येईल.
ऍपल- सिनमन केक
ऍपल- सिनमन हे कॉम्बिनेशन थंडीच्या दिवसात खाण्यासाठी अगदी हिट आहे, जिभेचे चोचले आणि तब्येत यांचा मेळ साधण्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे.
गुलाबजाम केक
आणि.. जर का तुम्हाला ख्रिसमसच्या निमित्ताने मन भरून गोड खायचे असेल तर हा पर्याय अगदी डोळे झाकून निवडता येईल. गुलबजाम सोबत केक चे फ्युजन करून ही टेस्टी ट्रीट तयार करता येईल.
पारंपरिक रम केक
जसे तुम्हाला पहिलेच असेल की यातील बरेचसे फ्लेव्हर हे अगदी घरगुती पदार्थांपासून बनणारे आणि कमी खर्चिक आहेत सोबतच तुमच्या आरोग्याला उपयुक्त ठरतील याचीही खात्री आहे, त्यामुळे ही फायद्याची डील ट्राय करून पहाच आणि हो.. केक कसे बनतात हे आम्हाला कळवायला विसरू नका..
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)