Chocolate Panipuri Viral Video: 'चॉकलेट पाणीपुरी' कधी खाल्ली आहे का? व्हिडिओ पाहा आणि मगच ठरवा
पण चॉकलेट पाणीपुरी आपण कधी ऐकली किंवा पाहिली आहे का? काहींनी नक्कीच पाहिली, ऐकली असेल पण त्याचे प्रमाण कमी असू शकते. सोशल मीडियावर 'चॉकलेट पाणीपुरी'चा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकाल.
Pani Puri Viral Video: तम्ही जर स्वत:ला चांगले खवय्या समजत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पाहायला हवा. होय, कदाचित या व्हिडिओत दिसणाऱ्या पदार्थाचे नाव आपण ऐकले नसेल. हा पादार्थ आहे 'चॉकलेट पाणीपुरी'. खरे तर वेगवेगळ्या पदार्थांपासून वेगवेगळे अन्नपदार्थ बनवल्याच्या अनेक घटना आणि रेसिपी आपण पाहिल्या असाल. पण चॉकलेट पाणीपुरी आपण कधी ऐकली किंवा पाहिली आहे का? काहींनी नक्कीच पाहिली, ऐकली असेल पण त्याचे प्रमाण कमी असू शकते. सोशल मीडियावर 'चॉकलेट पाणीपुरी'चा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो आपण येथे पाहू शकाल.
व्हिडिओत दिसणारा पदार्थाला आपण नाविन्यपूर्ण रेसीपी म्हणू शकता. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, विक्रेता एका प्लेटमध्ये चॉकलेटने झाकलेल्या पुरी, ओरिओ कुकी आणि व्हॅनिला आइस्क्रीम भरताना दिसतो. तो त्यावर चॉकलेट सॉस टाकतो आणि वर दोन किटकॅट्स शिंपडतो. व्हिडिओ पाहूनअनेकांनी कौतुक केले आहे. तर काहींनी मात्र ही रेसीपी न आवडल्याने नाराजी व्यक्त केली आहे. (हेही वाचा, Mumbai's Street Food Vada Pav: मुंबईचे स्ट्रीट फूड वडापाव जगातील 13 व्या क्रमांकाचे सर्वोच्च सँडविच)
व्हिडिओ
इन्स्टाग्रामवर शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 128k वारकर्त्यांनी पाहिला आहे आणि त्याला 3,800 लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओ न आवडलेल्या लोकांनी प्रतिक्रिया देताना याला "पाणीपुरी" म्हणणे बंद करण्याची विनंती केली. काही वापरकर्त्यांनी टिप्पण्यांमध्ये रडणारे इमोजी पोस्ट केले. तर काहींनी म्हटले की, या तथाकथित फ्यूजनमुळे मूळ खाद्यपदार्थाच्या सत्यतेला हानी पोहोचली आहे. एका वापरकर्त्याने नोंदवले की, " हॉर्लिक्स पाणीपुरी, रेडबुल पाणीपुरी, कोका कोला पाणीपुरी, व्हिस्की पाणीपुरी, चिकन नगेट पेन पुरी, चिकन बिर्याणी पाणीपुरी आता आणखी काय राहिले आहे.