वजन कमी करण्यासाठी बेसनाची कढी उत्तम उपाय, जाणून घ्या फायदे
त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. मात्र काही असे घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करु शकतात.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे वजन वाढण्याचे प्रमाण खुप वाढले आहे. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी विविध उपाय केले जातात. मात्र काही असे घरगुती उपाय आहेत जे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करु शकतात. त्यापैकी एक म्हणजे बेसनाची कढी. उत्तर भारतात बेसन कढी शुभ मानली जात असून सणामध्ये ती प्रसाद म्हणून दिली जाते. फक्त सणापूर्तीच बेसन कढी मर्यादित नसून तिची टेस्ट आणि वास काही जणांना आवडतो.
बेसनाच्या कढीमध्ये विटामिन्स आणि मिनिरल्स असून ते शरीराच्या चयापचानासाठी गुणकारी ठरतात. त्याचसोबत कढीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फोरस सुद्धा असते. तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा बेसनाची कढी फार उपयुक्त असल्याचे मानले जाते. तर जाणून घ्या बेसनाच्या कढीचे आरोग्यासाठी काय फायदे होतात.
>>बेसनाच्या कढीमध्ये लोह आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. जे हिमग्लोबिन वाढवण्यास मदत करतात.
>>तसेच अॅक्ने डार्क स्पॉट्स कमी करण्यासह त्वचेसंबंधित समस्या दूर होतात.
>>गर्भवती महिलांनी कढी खाणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यामध्ये फोलिएट, विटामिन B6 आणि लोह असतात. ते होणाऱ्या बाळाची वाढ करण्यासाठी फार उपयुक्त मानले जातात.
>>बेसनाच्या कढीमध्ये उत्तम बॅक्टेरिया असून ते पोटासाठी गुणकारी ठरतात. तसेच कढी खाल्ल्याने डायझेशन ठिक राहते.
>>कढीमध्ये मॅग्नेशियम असते ते स्नायूंना बळकटपणा आणण्यास मदत करते. तसेच हृदयासंबंधित समस्या सुद्धा दूर राहतात.
(हिवाळ्यात शरीरासाठी उपयुक्त ठरेल आलं-लसणाचं लोणचं, जाणून घ्या हे महत्त्वाचे फायदे)
बेसनाची कढी बनवताना त्यामध्ये थोडे छास सुद्धा मिक्स केले जाते. बेसनाच्या पीठामध्ये प्रोटीन्स असतात. त्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी फार मदत करतात.