Diwali 2018 : सणाच्या दिवसात स्मार्ट खरेदी करण्साठी खास 5 टिप्स

सणाच्या वेळी खरेदी करावयाची असेल तर या 5 टीप्स जरुर लक्षात ठेवा.

शॉपिंग (Photo Credits : Pixabay)
सणाच्या निमित्ताने प्रत्येकजण भरभरुन खरेदी करतात. परंतु या सणाच्या दिवसात ग्राहकांना दुकानदार किंवा ऑनलाईन शॉपिंगसारख्या वेबसाईट त्यांच्याकडील वस्तूंचा खप व्हावा यासाठी विविध मार्ग अबलंबतात. मात्र जर तुम्हाला सणाच्या वेळी खरेदी करावयाची असेल तर या 5 टीप्स जरुर लक्षात ठेवा.

1. खरेदीचे बजेट बनवा

जर तुम्हाला सणाच्या दिवसात दुकानातून किंवा ऑनलाईन शॉपिंग करावी असे वाटते. मात्र खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला उपयोगी होईल अशा वस्तूंची खरेदी करा.

2. बाजारभावाचा अभ्यास करा

जर सणाच्या दिवसात तुम्ही घर किंवा कोणतीही महागडी वस्तू खरेदी करणार असाल तर त्याबद्दल माहिती काढा.तर या वेळी वृत्तपत्रातून वस्तूंवर भरघोस सूट असलेली जाहिरात  दिली जाते. मात्र प्रत्यक्षात असे काही नसल्याचे ग्राहकांना खरेदी करणायस गेल्यावर कळते.

3. योग्य वेळ निवडा

दिवाळीमध्ये विविध वस्तूंवर भरघोस सूट दिल्याचे दिसून येते. परंतु काही वस्तू खरेदी केल्याचा वर्षभरातच त्याचा कितपत फायदा होतोय हे दिसते.

4. ऑनलाईन शॉपिंगचा फायदा घ्या!

ऑनलाईन शॉपिंग करण्याचे खीप फायदे आहेत. तर वस्तू्ंच्या खरेदीवर कॅशबॅक, सूट यांसारखे ऑफर्स दिल्या जातात.

5. वस्तूंची तुलना करा

सणाच्या निमित्ताने ऑनलाईन खरेदी करण्यासोबत दुकानांमध्ये ही सेल चालू असतो. तर एका दुकानील वस्तूची किंमत दुसऱ्या दुकानातील किंमतीशी तुलना करा. त्यानुसारच योग्य त्या किंमत असलेल्या दुकानातून खरेदी करा.