World Vadapav Day: मुंबई चं लोकप्रिय फास्ट फूड 'वडापाव' बद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

मुंबई मध्ये फास्ट फूड मध्येही अनेक पर्याय उपलब्ध आहे. कधीही न झोपणारी ही मुंबईनगरी कोणाला उपाशी झोपायला देखील देत नाही. नाक्या नाक्यावर मिळणारा एक चमचमीत पदार्थ म्हणजे वडापाव. आज 23 ऑगस्ट हा दिवस 'वडापाव दिवस' (World Vadapav Day) म्हणून पाळला जातो. या दिवसाची नेमकी सुरूवात कशी, कुठे झाली याची ठोस माहिती नाही पण या दिवसा निमित्त जाणून घ्या वडापाव या लोकप्रिय फास्ट फूड बाबतच्या खास गोष्टी!

वडपावचा जन्म 1966 चा. दादर स्टेशन बाहेरील अशोक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर वडापाव पहिल्यांदा बनला, असे मानले जाते. त्याचदरम्यान, दादर मधील सुधाकर म्हात्रे यांनी वडापावची सुरुवात केली. फक्त बटाट्याची भाजी आणि चपाती खाण्याऐवजी भाजीचा गोळा बेसनात घोळवून तळून पावासोबत खाल्यास अधिक स्वादिष्ट लागतो हे लक्षात आल्याने वडापावची सुरुवात झाली आणि वडापावची इतक्या वर्षांची यशस्वी परंपरा मुंबईला लाभली. मुंबईच्या खाद्यसंसकृतीचा तो एक भाग बनला.

गरीबांनाही परवडेल अशा दरात वडापाव मिळत असल्याने तो अल्पावधीतच लोकप्रिय झाला आणि त्याची ख्याती सर्वदूर पसरली. मुंबईत वडापावची सुरुवात झाली तेव्हा त्याची किंमत अगदी 10 पैसे इतकी होती.

मुंबईतील दादर, लालबाग, परेल आणि गिरगांव येथील मिल मजूरांमुळे खरंतर वडापावला लोकप्रियता मिळाली. 1970 ते 1980 च्या काळात मुंबईमध्ये मिल बंद झाल्या. त्यानंतर अनेक युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून वडापावच्या गाड्या सुरु केल्या. त्यानंतर मुंबईच्य गल्लीगल्लीत वडापावच्या गाड्या दिसू लागल्या. यादरम्यान शिवसेनेने मुंबईतील दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन छेडले. याचाच एक भाग म्हणून काही शिवसैनिकांनी दक्षिण भारतीय पदार्थ सोडून वडापाव खाण्यास सुरुवात केली. (World Vada Pav Day: मुंबई मधील या '7' वडापावची चव नक्की चाखाच!)

तसंच मराठी भाषिकांच्या समर्थनार्थ वडापाव खाण्याचे आवाहन शिवसैनिकांनी लोकांना केले. या सर्व गोष्टींमुळे मुंबई आणि परिसरात वडापावची लोकप्रियता वाढली. त्यादरम्यान, शिवसेनेने देखील 'शिव वडापाव'ची सुरुवात केली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif