World UFO Day 2021: वर्ल्ड यूएफओ डे का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि माहिती

World UFO Day 2021: वर्ल्ड यूएफओ डे का साजरा केला जातो? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि माहिती

World UFO Day ( File Image )

आजचा दिवस (2 जुलै) जगभरात वर्ल्ड यूएफओ डे (World UFO Day) म्हणून साजरा केला जातो. आकाशात दिसणाऱ्या अज्ञात वस्तुला अनआयडेंटीफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट (Unidentified flying object) म्हणून ओळखले जाते. यूएफओ बाबत माहिती आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा केला जातो. बरेच लोक त्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवतात. हा दिवस त्यांच्यासाठी साजरा केला जातो. आज जर तुम्हाला काही लोक दुर्बिणीसह आकाशाकडे पाहात असताना दिसले तर आश्चर्यचकित होऊ नका. चला तर मग या दिवसाचे महत्त्व आणि हेतू जाणून घेऊया.

का साजरा केला जातो World UFO Day? 

वास्तविक,जागतिक यूएफओ दिवस एक जागरूकता दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 2 जुलै रोजी  हा 'वर्ल्ड यूएफओ डे' साजरा केला जातो.  यूएफओ पृथ्वीवर बर्‍याच वेळा पाहिले गेले आहेत आणि विशेषतः लोकांमध्येही याची प्रकरणे प्रचलित आहेत. मात्र, त्या दाव्यातील सत्यता मात्र उद्याप पडताळता आली नाही. तसेच, या दाव्याला पुष्टी मिळेल असेही फारसे काही हाती आले नाही. सर्वात आधी अमेरिकेत आकाशात मोठ्या प्रमाणात अज्ञात फ्लायंग साॅसर सारखी वस्तू दिसली होती अशी बातमी मीडियामध्ये सांगण्यात आली होती. वास्तविक, 2 जुलैला 'यूएफओ दिवस' साजरा करण्याचे उद्दीष्ट म्हणजे त्यांच्या अस्तित्वाबद्दल जाणून घेणे आहे.

1897 साली  टेक्सस मध्ये UFO बघण्यात आला होता 

मीडिया रिपोर्टनुसार, यूएफओ टेक्सासमध्ये 1897 मध्ये दिसला होता. लोकांना सिगारच्या आकाराची मोठी वस्तू दिसली होती, जी पवनचक्कीवर धडकली होती. तसेच टेक्सस हिस्टोरिकल कमिशन ला असे संकेत मिळाले होते की,  1897 मध्ये तिथे विमान कोसळले होते, त्या दुर्घटनेतून एका ऐलियनचा मृतदेह सापडला होता. आणि एका अज्ञात जागी त्याला पुरण्यात आले होते.