World Sanskrit Day Wishes: संस्कृत दिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Messages, WhatsApp Status द्वारा देत साजरा करा हा खास दिवस

दरवर्षी श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा संस्कृत दिन भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान आणि ज्ञानपरंपरेचा पाया असलेल्या संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी समर्पित आहे. या दिनाचे महत्त्व आणि पार्श्वभूमी जाणून घेऊया.

World Sanskrit Day Wishes: संस्कृत दिनाच्या शुभेच्छा मराठमोळ्या Messages, WhatsApp Status द्वारा देत साजरा करा हा खास दिवस
संस्कृत दिन शुभेच्छा

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला भारतात रक्षाबंधनाच्या सणाबरोबरच संस्कृत दिन (World Sanskrit Day) देखील साजरा केला जातो. यंदा हा संसकृत दिन 28 ऑगस्ट दिवशी आहे. जगातील सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असलेल्या संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी आणि तिच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.  भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, विज्ञान आणि साहित्याचा पाया मानल्या जाणाऱ्या या भाषेचे स्थान आजही अनन्यसाधारण आहे. मग अशा या भारतीय भाषेप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत तिच्या प्रचारासाठी आज तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळीच्या खास WhatsApp Status, Messages, Wishes, Quotes, Greetings मधून शुभेच्छा देत हा दिवस साजरा करा.

संस्कृत ही भारतीय उपखंडातील अनेक भाषांची जननी मानली जाते. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती यांसारख्या अनेक आधुनिक भारतीय भाषांची मुळे संस्कृतमध्ये सापडतात. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण-महाभारतासारखी महाकाव्ये तसेच आयुर्वेद आणि खगोलशास्त्रासारख्या प्राचीन शास्त्रांचे लेखन याच भाषेत झाले आहे. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरा समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेचे ज्ञान अत्यंत मोलाचे मानले जाते.

संसकृत दिनाच्या शुभेच्छा

संस्कृत दिन शुभेच्छा
संस्कृत दिन शुभेच्छा
संस्कृत दिन शुभेच्छा
संस्कृत दिन शुभेच्छा
संस्कृत दिन शुभेच्छा

आधुनिक काळात संस्कृत भाषा बोलणाऱ्यांची संख्या मर्यादित असली, तरी या भाषेतील ज्ञानभांडार जपण्याची आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी समाजावर आहे. संस्कृत दिनाच्या निमित्ताने विविध विद्यापीठे, संस्कृत पाठशाळा आणि सांस्कृतिक संस्था या भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विशेष उपक्रम राबवतात.

 संस्कृत भाषेला जगभरातील भाषाशास्त्रज्ञांकडूनही मान्यता मिळाली आहे. संगणक विज्ञान क्षेत्रातही संस्कृत व्याकरणाच्या तर्कशुद्ध रचनेचा अभ्यास केला जात असून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात संस्कृतच्या रचनात्मक साच्याचा उपयोग होऊ शकतो, असे काही संशोधकांचे मत आहे. यामुळे या भाषेचे महत्त्व केवळ सांस्कृतिक न राहता आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातही अधोरेखित होत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 28, 2026 08:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).