World Music Day 2020: सांज ये गोकुळी ते सावर रे पर्यंत मराठी सिनेसृष्टीतील अजरामर गाणी पाहा एका क्लिक वर (Videos Inside)

प्रत्येकासाठी संगीत सुलभ करण्यासाठी प्रत्येक वर्षी जगभरात विनामूल्य मैफिली आयोजित केल्या जातात. या दिवशी आपण अशा काही मराठी सुरेल गाणी पाहणार आहोत जे आपल्याला ऐकण्यासाठी एक पर्वणी सिद्ध होईल.

जागतिक संगीत दिन 2020

आज जागतिक योगदिन, फादर्स डेसोबत जागतिक संगीत दिन (World Music Day) देखील साजरा केला जात आहे. कुठेही गाण्यांचा आवाज ऐकताच आपले कान लगेच उभे राहतात. संगीत (Music) हा एक असा अमूल्य ठेवा आहे जो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आणि वेळोवेळी साथ देते. नैराश्यात, तणावसोबत अन्य आजारांना सामोरे  जाणाऱ्या माणसाच्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी संगीत महत्वाची भूमिका निभावते. शिवाय, सुख आणि दुःखाच्या वेळीही आपल्याला संगीताची गरज भासते. त्यामुळे जीवनातला खरा सोबती संगीत असतो असे म्हटले तर काही नाही. प्रत्येकासाठी संगीत सुलभ करण्यासाठी प्रत्येक वर्षी जगभरात विनामूल्य मैफिली आयोजित केल्या जातात. या दिवशी आपण अशा काही मराठी सुरेल गाणी पाहणार आहोत जे आपल्याला ऐकण्यासाठी एक पर्वणी सिद्ध होईल. (World Music Day 2020: मराठी कलाकारांचे जिंदगी गाण्यापासून ते a cappella गाण्यापर्यंत मराठी संगीतातच झालेले 'हे' भन्नाट प्रयोग!)

जागतिक संगीत दिनाची सर्वात पहिले सुरुवात सुरूवात फ्रान्समध्ये झाली. फ्रान्समध्ये या दिनाला 'फेटे डेला म्युसिक्यू' या नावाने देखील ओळखले जाते. फ्रान्समधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मॉरीश फ्लेरेट यांनी त्यावेळी तिथल्या सांस्कृतिक विभागासाठी या दिनाची सुरुवात केली होती, तेव्हापासून 21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर फ्रान्ससह इतरही देशांमध्येही हा दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. अर्जेंटिना, ब्रिटन, लक्जमबर्ग, जर्मनी, चीन, लेबनॉन, कोस्टा रिका या देशांसह भारतात देखील हा दिवस साजरा केला जातो. या खास दिवशी पाहा ही मधुर मराठी गाणी:

सांज ये गोकुळी

कुण्या गावचा आला पाखरू

बेला शिंदे यांच्या गाणी

सदाबहार गीते

घेई चंद मकरंद

ऐरणीच देव तुला

संगीत हे एखाद्यासाठी ध्यान करण्याचे साधन आहे, एखाद्यासाठी आनंद तर,  एखाद्यासाठी आयुष्य. एखाद्याला कठीण काळात जगण्याचे धैर्य, वाईट काळात एखाद्याचे सामर्थ्य आणि आराम आहे संगीत. संगीत हे एक माध्यम आहे जे आपल्या जीवनातील बर्‍याच टप्प्यावर आपल्याला साथ देते.