World Music Day 2019: जागतिक संगीत दिन साजरी करण्याची प्रथा कशी आणि कुठून झाली?
12 सूरांची जादू हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर संगीतामुळे अनेक आजारांवर मात करता येऊ शकते.
जगात जेव्हापासून नादाची निर्मिती झाली असेल तेव्हापासूनच संगीत निर्माण झालं आहे. जगात संगीताचे विविध प्रकार आहेत. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते पण संगीत आवडत नाही अशी व्यक्ती क्वचितच आढळते. जगभरात 21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन (World Music Day) म्हणून साजरा केला जातो. 12 सूरांची जादू हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नाही तर संगीतामुळे अनेक आजारांवर मात करता येऊ शकते. 21 जून दिवशीच जागतिक योग दिन का साजरा केला जातो?
जागतिक संगीत दिन साजरा करण्याची सुरूवात कुठून झाली?
जागतिक संगीत दिन सुरू करण्याची सुरूवात 21 जून 1982 पासून झाली आहे. फ्रांसमधून जागतिक संगीत दिन साजरा करण्याच्या प्रथेला सुरूवात झाली. ‘Fete de la Musique’ या नावाने फ्रान्स मध्ये खास सेलिब्रेशन केलं जातं. यामध्ये प्रख्यात संगीत क्षेत्रातील कलाकार सामान्यांसोबत संगीत सोहळ्याचं सेलिब्रेशन करतात.
भारतामध्येही संगीत हे प्राचीन काळापासून आपल्या प्रत्येक सुख दु:खाच्या क्षणी सोबत असतं. सामवेदामध्ये संगीताचा उल्लेख आहे. देव देवतांच्या कथांमध्ये संगीताचा, विविध वाद्यांचा आणि त्यामधून घेतल्या जाणार्या संगीतप्रकारांचा उल्लेख आढळतो. यामधून पुढे शास्त्रीय संगीताचा उगम झाला. राग, रागिण्यांमधून विविध प्रकारांमध्ये संगीत विभागले गेले. कलाकृतींच्या माध्यमातून आजही संगीत विकसित घेतले जाते.