World Food Day 2019: मुंबई, पुणे शहरात 'या' NGO ला उरलेलं अन्न फेकण्याऐवजी दान करून भूक भागवण्याचं पुण्य मिळवा!
जगभरात आज (16 ऑक्टोबर) जागतिक अन्न दिन साजरा केला जाणार आहे. यंदा “Our Actions Are Our Future. Healthy Diets for A #ZeroHunger World" या थीमवर सेलिब्रेशन केलं जाणार आहे.
जगभरात आज (16 ऑक्टोबर) जागतिक अन्न दिन साजरा केला जाणार आहे. यंदा “Our Actions Are Our Future. Healthy Diets for A #ZeroHunger World" या थीमवर सेलिब्रेशन केलं जाणार आहे. भूकेलेल्यांना अन्नदान करणं हा माणूसकीचा धर्म आहे. त्यामुळे आजच्या जगतिक अन्नदिनाचं औचित्य साधून भविष्यात तुमच्या घरी आयोजित पार्टी, लग्नामधील जेवण किंवा भंडारा दरम्यान प्रमाणापेक्षा जास्तीचं जेवण बनवल्याने उरलं असेल तर ते फेकून देऊ नका. मुंबई, पुणे सह देशभरात अनेक स्वयंसेवी संघटना उरलेलं अन्न गरीब, भूकेलेल्यांना दान करायला मदत करतात.
जगभरात 117 देशांमधून भूकबळींच्या क्रमवारी भारत 102 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे भूकेलेल्यांना अन्नदान करून त्यांची एका दिवसाची भूक भागवायची असेल तर मुंबई, पुण्यामध्ये या संस्थांची मदत घ्यायला विसरू नका.
मुंबई, पुणे शहरातील अन्नदान करायला मदत करणार्या स्वयंसेवी संघटना
-
रोटी बॅंक (मुंबई डब्बेवाला असोसिएशन)
मुंबईच्या डब्बेवाल्यांनी उरलेलं अन्न फेकण्याऐवजी त्यांच्याकडे गोळा करून गरीबांमध्ये वाटप करण्यासाठी रोटी बॅंक हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये पार्टी, सामाजिक, सार्वजनिक कार्यक्रम ते घरातील उरलेलं अन्न देखील गोळा करण्यासाठी मदत केली जाते.
कसं कराल दान?
+919867221310 आणि+918652760542 या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
-
रॉबिन हूड आर्मी (Robin Hood Army)
पुणे, मुंबई सह देशभरात रॉबिन हूड आर्मी या संघटनेचे कार्यकर्ते काम करतात. यामध्ये घरापासून रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयामधील उरलेलं अन्न फेकून देण्याऐवजी गोळा करून भूकेलेल्यांमध्ये वाटप करण्याचं काम रॉबिन हूड आर्मी करते. देशभरात सुमारे 8000 हून अधिक स्वयंसेवक यामध्ये काम करतात.
कसं कराल दान?
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
-
फीडिंग इंडिया (Feeding India)
भूकेलेल्यांची गरज आणि वाया जाणारे अन्न यांच्यामधील समन्वय साधण्यासाठी फीडिंग इंडिया काम करते. देशभरातील 32 शहरांमध्ये 2 हजाराहून अधिक कार्यकर्ते फीडिंग इंडियासाठी काम करतात. लग्न, हॉटेल्स मध्ये उरलेलं जेवणं फेकण्याऐवजी गोळा करून भूकेलेल्यांची गरज भागवण्यासाठी मदत करतात.
कसं कराल दान?
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
देशामध्ये चिमुरड्यांना वाढत्या वयानुसार पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे त्यांची वाढ खुंटते, कुपोषणासारख्या समस्या वाढत आहे. शहर आणि ग्रामीण भारतामध्ये अनेकांना दोन वेळची भूक भागवण्यासाठी पुरेसे आणि पोषक अन्न मिळत नाही. त्यामुळे यंदा जागतिक अन्न दिनाच्या दिवशी अन्न फेकून देऊ नका. आवश्यक तितकेच अन्न बनवण्याची सवय लावा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)