Women'S Day 2019 दिवशी सचिन तेंडुलकर आई, पत्नी आणि मुलीसाठी झाला शेफ, वांग्याच्या भरीताला आईकडून मिळाली 'अशी' पोचपावती (Watch Video)

क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) मात्र आज जागतिक महिला दिवस 2019 दिवशी त्याची आई, पत्नी आणि मुलीसाठी शेफ बनला होता.

Chef Sachin Tendulkar on IWD2019 (Photo Credits: Twitter)

8 मार्च हा जागतिक महिला दिवस (International Women's Day) म्हणून साजरा केला जातो. अनेकींनी स्वतःसाठी आजचा दिवस खास बनवला असेल पण क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) मात्र आज त्याची आई, पत्नी आणि मुलीसाठी शेफ बनला होता. वूमन्स डे चं औचित्य साधून सचिन तेंडुलकरने आज वांग्याचं भरीत बनवलं. स्वतः बनवलेलं वांग्याचं भरीत त्याने सर्वात आधी आईला चाखायला दिलं आणि सचिन तेंडुलकरच्या आईनेही लेकाच्या पाकशास्त्राचं कौतुक केलं आहे. सचिन तेंडुलाकरने हा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. Women's Day 2019 Theme Color: जागतिक महिला दिन सेलिब्रेशन मध्ये 'जांभाळ्या' रंगाचं महत्त्व काय?

क्रिकेटचा देव समजला जाणारा सचिन तेंडुलकर हा खवय्यादेखील आहे. आज महिला दिवस स्पेशल त्याने घरीच वांग्याचं भरीत बनवलं. हे भरीत आई आणि पत्नी अंजली साठी आहे असे त्याने व्हिडिओमध्ये सांगितले. भरीत बनवल्यानंतर सचिन ते कसं झालंयं हे विचारायला त्याच्या आईच्या खोलीत गेला. सचिनच्या आईनेही ते चाखून उत्तम जमलयं! असा शेरा दिला. मात्र स्वतःच्या पाकशास्त्राबददल फारसा आत्मविश्वास नसलेला सचिन म्हणाला, आई अशीच असते. कसंही असेल तरी त्या तक्रार करत नाही. म्हणूनच त्यांची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. International Women's Day 2019 Google Doodle: 'महिला' शक्तीला सलाम करणारे गुगलचे खास 'महिला दिवस' विशेष डूडल!

आज विविध स्तरांमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात महिला दिवसाचं सेलिब्रेशन झालं. मग तुमचा यंदाचा वूमन्स डे कसा होता? हे आम्हांला नक्की सांगा

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now