Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठासाठी '22 जानेवारी' हा दिवस का निवडण्यात आला? काय आहे यामागचं खास कारण? जाणून घ्या

या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12.29 ते 12.30 पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल.

Ayodhya Ram Mandir (PC - ANI)

Ram Mandir Pran Pratishtha: सध्या देशभरातील जनता 22 जानेवारी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण, या दिवशी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात (Ram Mandir) राम लल्लाची (Ram Lalla) प्राण प्रतिष्ठापणा (Pran Pratishtha) होणार आहे. अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे. परंतु, तुम्हाला प्रश्न पडला की, राम ल्ललाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी या दिवसाचीचं का निवड करण्यात आली? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आम्ही आज या लेखातून देणार आहोत. चला तर मग 22 जानेवारी, हा दिवस प्राणप्रतिष्ठासाठी निवडण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊयात...

'या' कारणामुळे निवडण्यात आली 22 जानेवारी तारीख -

ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेतायुगात अभिजीत मुहूर्तावर झाला होता. सोमवार, 22 जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजीत मुहूर्ताचा योगायोग आहे. अशा स्थितीत, या दिवशी अभिजीत मुहूर्त दुपारी 12.11 पासून सुरू होईल आणि 12.54 पर्यंत चालेल. त्यामुळेच रामलाल यांच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी ही तारीख निवडण्यात आली आहे. (हेही वाचा -Ayodhya Land Dispute Case मध्ये बाबरी मस्जिद चे मुख्य पक्षकार Iqbal Ansari यांनाही मिळालं राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण (Watch Video))

याशिवाय या शुभ मुहूर्तावर राम लल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीच्या आत वास करतील, अशीही श्रद्धा आहे. सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभ मुहूर्त पाहूनच केले जाते. त्यामुळे रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकसाठी पौस महिन्यातील द्वादशी तारीख 22 जानेवारी 2024 निवडण्यात आली आहे. (हेही वाचा - Ram Bhajan Shared By PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला Swasti Mehul यांच्या आवाजातील Ram Aayenge गाण्याचा व्हिडिओ; म्हणाले..., (Watch Video))

राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेला विशेष योग -

या विशेष तिथीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, रवियोग असे अनेक शुभ योग तयार होत आहेत. या वेळी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त 12.29 ते 12.30 पर्यंत असेल. या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif