Diwali 2020: धनतेरस च्या दिवशी का खरेदी करतात सोने-चांदी किंवा तांब्या-पितळाची भांडी? जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त

हिंदी पंचांगात यंदा 13 नोव्हेंबर रोजी धनतेरस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लोक सोन्या-चांदीची भांडी खरेदी करतात.

धनतेरस 2020 (File Photo)

Diwali 2020: हिंदूंच्या धार्मिक परंपरेनुसार, कार्तिक महिन्यात कृष्णपक्ष त्रयोदशीला धनतेरस (Dhanteras 2020) साजरा करण्याची परंपरा आहे. हिंदी पंचांगात यंदा 13 नोव्हेंबर रोजी धनतेरस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी लोक सोन्या-चांदीची भांडी खरेदी करतात. त्यामुळे धनतेरसच्या दिवशी फक्त भारतात नव्हे, तर जगभरातील ज्वेलर्सची दुकाने रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेली दिसतात. या दिवशी संपर्ण बाजारपेठा दिव्यांच्या प्रकाशाने चमकत असतात. परंतु, कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की, धन तेरेसच्या दिवशी सोने-चांदी (Gold-Silver) किंवा नवीन भांडी (Utensils) खरेदी करण्याच्या परंपरेमागे नेमकी काय कथा आहे? आज आपण या लेखातून यासंदर्भात जाणून घेणार आहोत. धनतेरसच्या दिवशी सोन्या-चांदीची भांडी का विकत घेतात? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घेता येईल.

'पंचोत्सव' म्हणजे काय?

दीपावलीदरम्यान पाच प्रमुख उत्सव साजरे करण्याची परंपरा आहे. म्हणूनचं याला पंचोत्सव म्हणूनही ओळखले जाते. या उत्सवात धनतेरसचे नाव सर्वप्रथम येते. यानंतर छोट्या दिवाळीचा सण, मोठ्या दीपावलीचा सण म्हणजेचं गोवर्धन पूजा आणि शेवटी भाऊबीज साजरा करण्याची प्रथा आहे. या पंचोत्सवाचा गौरव केवळ भारतातचं नव्हे, तर संपूर्ण जगात उत्साहाने साजरा केला जातो. (हेही वाचा -  Vasu Baras 2020 Date and Significance: वसुबारस तारीख, महत्त्व आणि परंपरा)

धनतेरसच्या दिवशी का खरेदी करतात सोन्या-चांदी आणि पितळाच्या वस्तू ?

पौरानिक कथेनुसार, माता लक्ष्मीप्रमाणेचं भगवान धन्वंतरि देखील समुद्र मंथनाच्या वेळीच जन्माला आले होते. त्यावेळी त्यांच्या हातात अमृत कलश होता. त्या आधारे धनतेरसच्या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. हळूहळू ही परंपरा विकसित झाली आणि सोन्या-चांदीची नाणी आणि दागिने खरेदी करण्याची परंपरा सुरू झाली. सोन्या-चांदीनंतर ही परंपरा वाहने खरेदी करण्यापर्यंत वाढली. धनतेरसच्या दिवशी भारताच्या बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी असते. या दिवशी सोने, चांदी, पितळ भांडी किंवा वाहने खरेदी करणे शुभ मानले जाते. अनेकजण धनतेरसच्या दिवशी दीपावलीशी संबंधित सर्व वस्तू आणि लक्ष्मी व गणेश यांच्या मूर्तीदेखील खरेदी करतात.

याशिवाय असंही म्हटलं जात की, या शुभ दिवशी आपण जे काही विकत घेतो त्या वस्तू आपल्यासाठी ‘गुड लक’ घेऊन येतात. त्यामुळे तुम्हीदेखील आपल्या बजेटनुसार या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, नाणे, दागिने, मूर्ती इ. परंतु, जर एखाद्याला काही कारणास्तव सोने किंवा चांदी खरेदी करणे शक्य नसेल, तर त्यांनी अस्वस्थ होण्याची आवश्यकता नाही. कारण, यादिवशी तुम्ही पितळाची किंवा ताब्याच्या वस्तू खरेदी करू शकता. धनतेरसच्या दिवशी तांब्या-पितळाच्या वस्तू खरेदी करणं शुभ मानलं जातं.

पारंपारिक कथा -

एकेकाळी हिम नावाचा एक राजा होता. या राजाच्या मुलाला शाप देण्यात आला होता की, लग्नाच्या चौथ्या दिवशीचं त्याचा मृत्यू होईल. असं असतानाही त्याचं लग्न करण्यात आलं. लग्नाच्या चौथ्या दिवशी त्याने राजपुत्राला सांगितले की, आपण रात्रभर झोपू शकलो नाही. नवऱ्याला झोप येऊ नये म्हणून त्याची पत्नी त्याला रात्रभर गाणी आणि कथा सांगत राहिली. राजाने त्या दिवशी घराच्या दाराजवळ सोन्या-चांदी आणि इतर मौल्यवान वस्तू ठेवल्या. तसेच घराभोवती दिवे लावले. जेव्हा यम हिम राजाच्या पुत्रांचा जीव घेण्यास आला, तेव्हा दागदागिने व दिव्यांच्या प्रकाशामुळे तो आंधळा झाला. त्या दिवशी त्याला घरात प्रवेश करता आला नाही. तो रात्रभर दागिन्यांच्या ढिगाऱ्यावर बसून गाणे ऐकत राहिला. सकाळी यमराज राजकुमाराचा जीव न घेता तिथून गेला. कारण तेव्हा मृत्यूची घडी संपली होती.

यंदाचा धनतेरसचा शुभ मुहूर्त कोणता ?

यावर्षी धनतेरस शुक्रवारी म्हणजेच 13 नोव्हेंबरला येत आहे. जो मुळात लक्ष्मीचा दिवस मानला जातो. त्यामुळे यावर्षी तुम्ही दिवसभरात कधीही सोने-चांदी किंवा पिवळ्या रंगाची भांडी खरेदी करू शकता. यंदा धनतेरसच्या शुभ मुहूर्ताचा प्रारंभ कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीच्या 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 9.30 ला सुरु होईल. हा मुहूर्त 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 05.59 वाजेपर्यंत असेल.