Holi 2024 Date: या वर्षी होळीचा सण कधी साजरा होणार? हिंदू धर्मात या सणाला का आहे महत्त्व? जाणून घ्या

दिवाळीनंतरचा हा हिंदूंचा दुसरा प्रमुख सण आहे. हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नसून त्याची लोकप्रियता इतर देशांमध्येही पसरली आहे. होळी पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारतात येतात.

Holi 2024 (PC - File Image)

Holi 2024 Date: होळी (Holi) हा हिंदूंचा सर्वात महत्वाचा सण आहे. वसंत ऋतूचे आगमन होताच होळीचीही प्रतीक्षा सुरू होते. याला रंगांचा सण असेही म्हणतात. कारण हा सण रंगांनी साजरा केला जातो. होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरा केला जातो. आता या उत्सवाची ख्याती परदेशातही पाहायला मिळते. त्यामुळे यंदा होळी कोणत्या दिवशी साजरी केली जाईल हे जाणून घेऊया...

होळीचा शुभ मुहूर्त -

फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 24 मार्च रोजी सकाळी 09:54 वाजता सुरू होत आहे. तसेच, ही तारीख 25 मार्च रोजी दुपारी 12:29 वाजता संपेल. अशा परिस्थितीत होलिका दहन रविवार, 24 मार्च रोजी होणार असून, 25 मार्च रोजी होळी साजरी केली जाणार आहे. (हेही वाचा - Shiv Jayanti 2024 Tithi Date: शिवजयंती आज तारखेनुसार पण पहा तिथीनुसार कधी होणार साजरी!)

होळीचे महत्व -

होळीला धार्मिक महत्त्वासोबतच सांस्कृतिक आणि पारंपारिक महत्त्वही आहे. दिवाळीनंतरचा हा हिंदूंचा दुसरा प्रमुख सण आहे. हा उत्सव केवळ भारतापुरता मर्यादित नसून त्याची लोकप्रियता इतर देशांमध्येही पसरली आहे. होळी पाहण्यासाठी अनेक पर्यटक भारतात येतात.

होळी हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश तसेच बंधुभाव, परस्पर प्रेम आणि सद्भावनेचा सण आहे. या दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळी बनवली जाते. पुरणपोळीचा नैवैद्य होळीला दाखवला जातो. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी होलिका दहन आणि भगवान श्री विष्णूची पूजा केल्याने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

होळी का साजरी केली जाते?

पौराणिक कथेनुसार, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता, परंतु हिरण्यकश्यपूने भगवान श्रीहरींचा खूप द्वेष केला. सर्व उपाय करूनही प्रल्हादांनी विष्णूची पूजा करणे सोडले नाही, तेव्हा हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिकासोबत एक योजना आखली. होलिकाला वरदान मिळाले होते की अग्नीने तिला कोणतीही हानी होणार नाही. यामुळे ती भक्त प्रल्हादला आपल्या कुशीत घेऊन अग्नीत बसली. तेव्हा भगवान विष्णूंनी होलिका जाळून राख केली होती आणि श्रीहरीच्या कृपेने भक्त प्रल्हाद वाचला. तेव्हापासून हा दिवस होलिका दहन म्हणून साजरा केला जातो.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif