Women's Equality Day 2023: महिला समानता दिन कधी आहे? काय आहे यामागचा इतिहास आणि महत्त्व? जाणून घ्या

हा दिवस 1920 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. महिला समानता दिन पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. 1853 मध्ये अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू झाला. महिलांच्या समानतेच्या मागणीसाठी 50 वर्षे सुरू असलेली चळवळ 1920 मध्ये संपली. तेव्हापासून हा दिवस महिला समता दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Women's Equality Day 2023 (PC - File Image)

Women's Equality Day 2023: भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. मात्र, आज प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपला वेगळा ठसा उमठवला आहे. महिलांना कायद्याने पुरुषांसारखे समान अधिकार मिळाले आहेत. परंतु समाजात त्यांच्या स्थानाबाबत असमानता आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांबाबत लोकांच्या मनात दुहेरी मानसिकता आहे. आजही समाजात महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिक स्थान मिळत नाही. मात्र, जगभरात महिलांना समान हक्क आणि जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशात लैंगिक समानता आणण्याच्या प्रयत्नात, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी अलीकडेच चार महिला सदस्यांना (50 टक्के) उपाध्यक्षपदासाठी नामनिर्देशित केले.

महिलांना समानतेचा अधिकार मिळावा आणि समाजात त्यांचे स्थान मजबूत व्हावे या उद्देशाने दरवर्षी महिला समानता दिन साजरा केला जातो. देशात महिलांना मतदानाचा अधिकारही नसताना हा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली. महिलांच्या समानतेच्या अधिकारावर सर्वप्रथम कोणत्या देशात चर्चा झाली आणि महिला समानता दिन कधी साजरा केला जातो हे जाणून घेऊयात...

महिला समानता दिनाचा इतिहास

दरवर्षी 26 ऑगस्ट रोजी महिला समानता दिन साजरा केला जातो. हा दिवस 1920 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली. महिला समानता दिन पहिल्यांदा अमेरिकेत साजरा करण्यात आला. 1853 मध्ये अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू झाला. महिलांच्या समानतेच्या मागणीसाठी 50 वर्षे सुरू असलेली चळवळ 1920 मध्ये संपली. तेव्हापासून हा दिवस महिला समता दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

तथापी, अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. याशिवाय विवाहित महिलांनीही मालमत्तेचा हक्क मागायला सुरुवात केली. 26 ऑगस्ट 1920 रोजी मतदानाचा हक्क मिळाल्याने हक्काच्या मागणीसाठीची चळवळ संपुष्टात आली. भारतातील महिलांना मतदानाचा अधिकार ब्रिटीशांच्या काळातच मिळाला. प्रथम अमेरिकेत आणि नंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर 26 ऑगस्ट हा महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात आला.

महिला समानता दिन थीम -

या वर्षी महिला समानता दिन 2023 ची थीम 'Embrace Quality' म्हणजेच समानता स्वीकारा अशी आहे. ही थीम 2021-26 च्या धोरणात्मक योजनेचा भाग आहे. थीम लैंगिक समानता प्राप्त करण्याची गरज अधोरेखित करते, जी केवळ आर्थिक विकासासाठीच नाही तर मूलभूत मानवी हक्कांसाठी देखील आवश्यक आहे.