Vat Purnima 2022 Date: वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या सावित्री व्रताचा शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि महत्त्व

वटपौर्णिमा पाळणाऱ्या महिला या दिवशी व्रत करतात. नियमानुसार, विवाहित महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात. हे व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्याचे फळ मिळते. या दिवशी उपवास केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते.

Vat Purnima (Photo Credits-Facebook)

Vat Purnima 2022 Date: वट सावित्री व्रत (Vat Savitri Vrat) ला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या वेळी हा सण 14 जून रोजी साजरा होणार आहे. या दिवशी स्त्रिया अखंड सौभाग्यवती म्हणून वट सावित्रीचा उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दान अनेक पटींनी फल देते. वटपौर्णिमा (Vat Purnima) व्रत कधी आणि कसे करायचे? यासंदर्भात जाणून घेऊयात...

महिला या दिवशी वट सावित्री व्रत ठेवून वटवृक्षाची पूजा करतात. वटपौर्णिमा पाळणाऱ्या महिला या दिवशी व्रत करतात. नियमानुसार, विवाहित महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात. हे व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्याचे फळ मिळते. या दिवशी उपवास केल्याने पतीला दीर्घायुष्य प्राप्त होते.

वटपौर्णिमा मुहूर्त -

पौर्णिमा प्रारंभः 13 जून 2022 रोजी उत्तर रात्रौ 9 वाजून 03 मिनिटे.

पौर्णिमा समाप्तीः 14 जून 2022 रोजी सायं. 05 वाजून 22 मिनिटे

वटपौर्णिमा/ वट सावित्री व्रत महत्त्व -

वट सावित्री व्रत हे सावित्री देवीशी संबंधित आहे. असे मानले जाते की, सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे जीवन यमराजाकडून परत आणले होते. या व्रतामध्ये सावित्रीसारख्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवांकडे प्रार्थना करतात. जेणेकरून त्यांच्या पतीला सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावे. अपत्यप्राप्तीसाठी देखील महिला हे व्रत ठेवतात.

निसर्गातील सर्व वृक्षांमध्ये वटवृक्षाचे वय सर्वात जास्त असते. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केली जाते. मान्यतेनुसार, वटवृक्षात सर्व देवता वास करतात. वटवृक्षाच्या मुळाशी ब्रह्मा, देठात विष्णू आणि डहाळ्यांमध्ये भगवान शंकर वास करतात. या झाडाच्या तळाशी टांगलेल्या फांद्या सावित्री देवीचे प्रतीक मानल्या जातात.