When is Ramzan Eid 2021: यंदा रमजान ईद कधी? जाणून घ्या त्याचे महत्व

या दिवशी पवित्र रमजानचा महिना म्हणजेच महिनाभर ठेवण्यात आलेला रोजा पूर्ण होतो.

Happy Eid-ul-Fitr 2020 | File Image

When is Ramzan Eid 2021: इस्लाम धर्मातील सर्वाधिक प्रमुख सण असलेला 'ईद उल-फितर' किंवा 'इद-अल-फ़ित्र' संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवशी पवित्र रमजानचा महिना म्हणजेच महिनाभर ठेवण्यात आलेला रोजा पूर्ण होतो. इस्लामिक कॅलेंडरनुसार, रमजानच्या महिन्यानंतर 10 व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला ईद साजरी केली जाते. या दिवशी गोड शेवय्यांसह अन्य पदार्थ बनवले जातात. यासाठीच त्याला 'मीठी ईद' असे सुद्धा म्हटले जाते. यंदा रमजान ईद भारतात 14 मे आणि गल्फ देशात एक दिवस आधी म्हणजेच 13 मे रोजी साजरी केली जाऊ शकते. परंतु या तारखा चंद्र कधी दिसेल यावर अवलंबून आहे. जर 13 मे रोजी चंद्र दिसला तर 14 मे दिवशी ईद साजरी केली जाणार आहे.(Shab-e-Qadr Mubarak 2021 Greetings & Duas: व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्स, फेसबुक मेसेज, शुभेच्छा पाठवत साजरा करा Laylat al-Qadr)

ईद उल-फ़ित्र किंवा मीठी ईद याची सुरुवात पैगंबर मुहम्मद यांनी सुरु केली होती आणि आतापर्यंत ती मुस्लिम बांधवांकडून साजरी केली जाते. हा दिवस शव्वाल महिन्याच्या पहिला दिवस अल्याने साजरा केला जातो. तर इस्लामिक कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात म्हणजेच रमजानच्या समाप्ती नंतर येतो. इस्लामिक कॅलेंडर नुसार, ईद-उल-फितर तेव्हा सुरु होतो जेव्हा शव्वालच्या पहिल्या दिवशी अर्धचंद्रामधून निघालेला प्रकाशाचा पहिला किरण जमीनीवर पडतो. तसेच वातावरणामुळे जर चंद्र दिसला नाही तर ती दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते.(Eid Mubarak 2021 Messages: रमजान ईद च्या शुभेच्छा Wishes, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन सर्व मुस्लिम बांधवांना म्हणा ईद मुबारक!)

काही वेळा असे होते की, ईदीचा चंद्र 29व्या रोजाच्या दिवशी सुद्धा दिसतो. जेव्हा चंद्र 29व्या रोजाच्या दिवशी दिसतो त्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीच ईद साजरी केली जाते. तसेच चंद्र जर 30 व्या दिवशी दिसला तर रोजा पूर्ण 30 दिवस होते आणि पुढील दिवशी ईदीचा सण साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव नवीन कपडे घालतात आणि मस्जिदमध्ये नमाज अदा करतात. या दिवशी विशेषरुपात धार्मिक प्रार्थना ही केली जाते. त्याला सलात असे संबोधले जाते.