Hindi Diwas 2022: 'हिंदी दिवस' कधी आहे? हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि महत्त्व काय? जाणून घ्या

कारण भारतात शेकडो भाषा आणि हजारो बोली बोलल्या जात होत्या. हे लक्षात घेऊन 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला. तेव्हापासून हा दिवस 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जाऊ लागला.

Hindi Diwas 2022 (PC - File Image)

Hindi Diwas 2022: 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषिक लोकांसाठी खूप खास आहे, या दिवशी देशभरात हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 1947 साली ब्रिटीश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतासमोर सर्वात मोठा प्रश्न होता तो भाषेचा. कारण भारतात शेकडो भाषा आणि हजारो बोली बोलल्या जात होत्या. हे लक्षात घेऊन 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला राजभाषेचा दर्जा दिला. तेव्हापासून हा दिवस 'हिंदी दिवस' म्हणून साजरा केला जाऊ लागला. हिंदी दिवसाचा इतिहास काय आहे आणि यंदाच्या हिंदी दिवसाची थीम काय आहे हे जाणून घेऊयात...

हिंदी दिवस साजरा करण्यामागचा इतिहास -

स्वातंत्र्यानंतर 1946 साली जेव्हा संविधान सभेसमोर राष्ट्रभाषेचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा राज्यघटनेच्या रचनाकारांसमोर हिंदी हा सर्वोत्तम पर्याय होता. मात्र, हिंदीला राष्ट्रभाषा बनवताना काही लोक विरोधातही होते. त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा अधिकृत भाषा म्हणून निवडल्या गेल्या. यानंतर 14 सप्टेंबर 1949 रोजी संविधान सभेने हिंदीला राजभाषा म्हणून घोषित केले. त्याचवेळी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या शिफारशीनंतर 14 सप्टेंबर 1953 पासून हिंदी दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. 10 जानेवारी रोजी जगभरात जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो.

हिंदी दिवसांचे महत्त्व-

शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये तसेच राष्ट्रीय स्तरावर हिंदी दिवस साजरा केला जातो. या दिवशी साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावेळी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व आणि इतिहास सांगितला जातो. हिंदी दिवसानिमित्त, राष्ट्रपती हिंदी भाषेच्या कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व लोकांचा सन्मान करतात.

दरम्यान, 10 सप्टेंबर रोजी जगभरात जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. जागतिक स्तरावर हिंदीचा प्रसार करणे हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर काही महिन्यांनी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. जागतिक हिंदी दिवस आणि राष्ट्रीय हिंदी दिवस याबद्दल लोक अनेकदा गोंधळात पडतात आणि त्यांच्यातील फरक माहित नसल्यामुळे ते हे दोन्ही दिवस एकच मानतात. परंतु, ज्या दिवशी संविधान सभेने हिंदीला भारताची अधिकृत भाषा म्हणून घोषित केले त्या दिवशी राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा केला जातो. तर जागतिक हिंदी दिनाचा उद्देश जागतिक स्तरावर हिंदीचा प्रचार करणे हा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif