Makar Sankranti 2024 Date: मकर संक्रांती कधी आहे? शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि महत्त्व जाणून घ्या

या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 02:54 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. या प्रसंगी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे असेल.

Makar Sankranti 2024 (PC - File Image)

Makar Sankranti 2024 Date: मकर संक्रांती (Makar Sankranti 2024) हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. हा सण फक्त जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो. म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार, मकर संक्रांतीचा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. हा सण देशभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो.

मकर संक्रातीपासून दिवस मोठे होऊ लागतात. तर रात्री लहान होऊ लागतात. या दिवशी जेव्हा दिवस आणि रात्र समान होतात तेव्हा वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. यावेळी मकर संक्रांतीबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. यंदा 14 जानेवारी की 15 जानेवारीला मकर संक्रात साजरी केली जाईल? याबाबत अनेकांना प्रश्न आहे. 2024 मध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल? हे जाणून घेऊयात...(हेही वाचा - Datta Jayanti Or Dattatreya Jayanti 2023 Date: दत्त जयंती कधी आहे? पूजा विधि, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)

ज्योतिषी आणि पंचांगानुसार मकर संक्रांतीचा सण 15 जानेवारीला साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य देव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे 02:54 वाजता मकर राशीत प्रवेश करेल. या प्रसंगी शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे असेल.

मकर संक्रांती शुभ मुहूर्त -

मकर संक्रांतीची पूजा पद्धत -

मकर संक्रांती 2024 महत्व -

मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ, चिरवा, उडीद डाळ, तांदूळ, घोंगडी आणि पैसा दान करणे फलदायी मानले जाते. असे केल्याने धन-संपत्ती वाढते आणि घरात सुख-समृद्धी नांदते. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान करण्याव्यतिरिक्त भगवान सूर्याची पूजा अवश्य करा, असे केल्याने निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा आशीर्वाद मिळतो.