International Yoga Day 2025: जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो? या वर्षीची थीम, इतिहास आणि महत्त्व घ्या जाणून
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 69 व्या अधिवेशनात 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर केला.
International Yoga Day 2025: योग ही प्राचीन भारतीय परंपरेने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. ती केवळ तुमच्या शारीरिक आरोग्यालाच नव्हे तर तुमचे मानसिक आरोग्यही निरोगी ठेवते. योगाच्या सरावाचा सन्मान करण्यासाठी आणि जगभरात त्याचे फायदे वाढवण्यासाठी जगभरात दरवर्षी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day 2025) साजरा केला जातो.
योग दिन 2025 ची थीम -
यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम 'एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग' आहे. 2025 हा एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण तो या जागतिक उत्सवाच्या 11 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत आहे. याशिवाय, या वर्षीच्या उत्सवात 10 प्रमुख कार्यक्रमांचा समावेश आहे, ज्यामध्ये 'योग संगम' हा प्रमुख कार्यक्रम समाविष्ट आहे, जो भारतातील 1 लाख ठिकाणी सामूहिक योग प्रदर्शने प्रदर्शित करतो.
जागतिक योद दिनाचा इतिहास -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दबावानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या 69 व्या अधिवेशनात 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर केला. तेव्हा पासून दरवर्षी 21 जून रोजी जागतिक योग दिन साजरा करण्यात येतो. 21 जून 2015 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात, पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाने दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मिळवले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व -
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट जगभरात योग करण्याच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे. योग म्हणजे मन आणि शरीर, विचार आणि कृती यांचे एकत्रीकरण आहे. योग केल्याने आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.
(The above story first appeared on LatestLY on Jun 20, 2025 04:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

