When is Gatari: यंदा श्रावणाआधी च्या रविवारी संकष्टी आणि एकादशी; मग गटारी किंवा आखाड पार्टी कधी?

श्रावण महिना सुरू होण्याआधीच्या दोन्ही रविवारी यंदा अनेक घरात मांसाहार होणार नाही. कारण 2 ऑगस्टच्या रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने आणि 9 ऑगस्टला एकादशी असल्याने अनेकांच्या गटारीचे रविवारचे प्लॅन्स रद्द झाले आहेत. मग पहा कधी असेल आखाड पार्टी किंवा गटारीची पार्टी.

Gatari Amavasya

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची (Shravan Month) सुरूवात यंदा 13 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. श्रावणाआधी अनेकांना आखाड पार्टी (Akhad party) म्हणजेच गटारी (Gatari) पार्टीचे वेध लागलेले असतात. या निमित्ताने मित्र मंडळी, घरातील सारे मंडळी एकत्र येऊन मनसोक्त मांसाहारावर ताव मारतात. मग यंदा गटारी किंवा आखाड पार्टीची तुमची मेजवानी आणि तारीख ठरली का? अवघ्या दहा दिवसांतच श्रावण सुरू होणार असल्याने फक्त हाच आठवडा तुम्ही मांसाहाराचा आनंद घेऊ शकणार आहात. पण यावर्षी मांसाहारासाठी रविवार सोडून इतर दिवसांचा विचार करावा लागणार हे तुम्हांला माहित आहे का?

गटारी किंवा आखाड पार्टी कधी होणार?

श्रावण महिना सुरू होण्याआधीच्या दोन्ही रविवारी यंदा अनेक घरात मांसाहार होणार नाही. कारण 2 ऑगस्टच्या रविवारी संकष्टी चतुर्थी असल्याने आणि 9 ऑगस्टला एकादशी असल्याने अनेकांच्या गटारीचे रविवारचे प्लॅन्स रद्द झाले आहेत. मग यंदा आठवड्याच्या एखाद्या वारीचं अनेकांना गटारीचे बेत करावे लागणार आहेत. बुधवार, शुक्रवारी मांसाहार करणार्‍यांसाठी यंदा 5 आणि 7 ऑगस्टला किंवा 12 ऑगस्टला आषाढ अमावस्येलाच गटारी किंवा आखाड पार्टीचं आयोजन करावं लागणार आहे.

गटारी म्हणजे काय?

गटारी चा काहीच सांस्कृतिक संबंध नाही पण आता श्रावण आणि चातुर्मासामुळे ज्या घरात पुढील किमान 1 ते 4 महिने मांसाहार बंद असेल म्हणून त्याआधी सारे एकत्र येऊन चमचमीत मासे, चिकन, मटणाचा आस्वाद घेतात. गटारीचा किंवा गटारी अमावस्येचा मद्यपानाचा, गटार लोळण्याचा संबंध नसतो.

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात कधी?

महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरूवात 13 ऑगस्ट दिवशी होणार आहे. 12 ऑगस्टच्या रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी अमावस्या संपणार आहे. हा श्रावण महिना 11 सप्टेंबर पर्यंत आहे. नक्की वाचा: Shravan Masarambh 2026: यंदा श्रावण महिन्याची सुरूवात कधी? जाणून घ्या श्रावणी सोमवार, मंगळागौर सह महत्त्वाच्या सणाच्या तारखा .

श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला दीप अमावस्या साजरी करण्याची पद्धतआहे. या निमित्ताने घरातील सारे दिवे स्वच्छ करून ते प्रज्वलित केले जातात. दीप अमावस्या आषाढी अमावस्या म्हणून देखील ओळखली जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement