Dhammachakra Pravartan Din 2024 Date: धम्मचक्र प्रवर्तन दिन कधी आहे? तारीख, महत्त्व आणि इतिहास घ्या जाणून

डॉ. आंबेडकर आणि त्यांच्या सुमारे 600,000 अनुयायांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून हा दिवस बौद्ध समाजातील लोक मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात...

Dhammachakra Pravartan Din 2024 Date (फोटो सौजन्य - File Image)

Dhammachakra Pravartan Din 2024 Date: 'धम्मचक्र प्रवर्तन दिवस' (Dhammachakra Pravartan Din 2024) दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी या दिवशी धर्मांतर केले होते. त्यांनी 14 ऑक्टोबर रोजी बौद्ध धर्म स्वीकारला होता. तेव्हापासून दरवर्षी 14 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा केला जार आणि त्यांच्या सुमारे 600,000 अनुयायांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला. म्हणून हा दिवस बौद्ध समाजातील लोक मोठ्या आदराने आणि उत्साहाने साजरा करतात. या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात...

धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा इतिहास -

भारतात जातीव्यवस्था आणि वर्णभेद यांसारखे भेदभाव समाजाच्या मुळांमध्ये रुजलेले आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आजच्या आधुनिकतेच्या युगातही भारतीय समाजात जातीवर आधारित भेदभाव कायम आहे. देशाच्या अनेक भागात उच्च जातीचे लोक खालच्या जातीतील लोकांशी भेदभाव करतात. भेदभावाच्या वाईटाशी लढण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी मोठे पाऊल उचलले. दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा दिवस विजयादशमीच्या दिवशी साजरा केला जातो.

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध धर्माच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी डॉ. आंबेडकरांचे अनेक बौद्ध अनुयायी ‘धम्मचक्र प्रवर्तन दिवस’ साजरा करण्यासाठी नागपुरातील दीक्षाभूमीवर एकत्र येतात. जिथे लोक एकमेकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतात.

दरम्यान, जेव्हा नागपुरात त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा ते म्हणाले होते, 'हिंदू धर्म चुकीच्या आदर्शांचा प्रसार करतो. हिंदू धर्म चुकीचे सामाजिक जीवन जगण्यास भाग पाडतो. या धर्माचा त्याग करून आज माझा पुनर्जन्म झाला आहे. यासह त्यांनी 22 प्रतिज्ञा घेतल्या होत्या. यापैकी एक प्रतिज्ञा होती की, मी माझा जुना हिंदू धर्म नाकारतो जो मानवजातीच्या समृद्धीसाठी हानिकारक आहे, जो मानवांमध्ये भेदभाव करतो आणि मला हीन समजतो.'