Dharmanath Beej 2024 Date: जाणून घ्या ‘धर्मनाथ बिज’ म्हणजे काय? केव्हा होणार साजरी
या दिवशी विशेष पूजा आणि विधी साजरे केले जातात.
माघ (Magh) महिन्यातील द्वितीया, तिला धर्मनाथ बीज (Dharmanath Bij) असे म्हणतात. या दिवशीं श्री गोरक्षनाथांनी धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा (Diksha)दिली. या वेळेस सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते. दर वर्षी माघ महिन्यात धर्मनाथ बीजोत्सव साजरा केला जातो. हा विधी श्री मच्छिंद्रनाथांचा मुलगा धर्मनाथ यांना समर्पित आहे. नवनाथ संप्रदाय आणि श्री गोरक्षनाथांच्या विविध अनुयायांसाठी या उत्सवाचे खूप महत्त्व आहे. धर्मनाथ बीज 2024 ची तारीख 11 फेब्रुवारी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावजवळील दामोरी येथे या दिवसाला खूप महत्त्व आहे. (हेही वाचा - Ganapati Photos Free Download For Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंतीनिमित्त 'या' ठिकाणी मोफत डाउनलोड करा गणपतीचे काही खास फोटो)
श्री धर्मनाथांनी श्री गोरक्षनाथांच्या शिकवणीची दीक्षा घेतल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी धर्मनाथ बीज हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी विशेष पूजा आणि विधी साजरे केले जातात. हा दिवस जगभरात विशेषत: नवनाथ समाजाच्या भक्तांकडून साजरा केला जातो. श्री गोरक्षनाथांनी “धर्मनाथबीजेचा” उत्सव प्रतिवर्षीं करण्याची त्रिविक्रमास आज्ञा दिली. तेव्हां सर्वास आनंद झाला व दरसाल या दिवशीं उत्सव होऊं लागला.
“माघ शुद्ध द्वितीया” ह्या दिवशी गोरक्षनाथ ह्यांनी धर्मनाथास नाथपंथाची दीक्षा दिली. तो सोहळा इतका अमुल्य झाला होता कि गोरक्षनाथ ह्यांनी सर्व प्रजेसमोर घोषणा केली की, जो कुणी यथाशक्ती ह्या द्वितीयेच्या दिनी दान धर्म, पुण्य कर्म करील, त्याचे सर्वतोपरी नाथ कल्याण करतील. त्याचे घरी सुख, शांती, धन संपदा नांदू लागेल व त्याचे मार्ग सुकर होतील. हा सोहळा “धर्मनाथ बीज” ह्या उत्सवाने ओळखला जातो.