Vivah Shubh Muhurat 2019-2020: यंदा विवाहाचे शुभ मुहूर्त फेब्रुवारी 2020 मध्ये सर्वाधिक; पहा पुढील वर्षभरातील लग्नाच्या तारखा
त्यामुळे यंदा तुम्ही लग्नासाठी सज्ज असाल तर पहा भावी आयुष्यासाठी विवाह मुहूर्तासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 तसेच 2020 मध्ये पहा कधी आहेत विवाहाचे शुभ मुहूर्त.
तुळशीच्या लग्नानंतर लग्नाळू तरूण-तरूणींच्या लग्नाचा बार उडवायला सुरूवात होते. काल (27 नोव्हेंबर) पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरूवात झाली आहे. श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याला देखील धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे यंदा तुम्ही लग्नासाठी सज्ज असाल तर पहा भावी आयुष्यासाठी विवाह मुहूर्तासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर 2019 तसेच 2020 मध्ये पहा कधी आहेत विवाहाचे शुभ मुहूर्त. Vivah Panchami 2019: विवाह पंचमी यंदा 1 डिसेंबरला, जाणून घ्या या दिवशी का केले जात नाही लग्न.
विवाह हे आयुष्यातील एक महत्त्वाचं वळण असतं त्यामुळे नव्या आयुष्याची सुरूवात करताना अनेकजण पत्रिका बघतात. विवाह देखील मुहूर्त बघून विशिष्ट दिवशी करण्याचा अट्टाहास असतो. मग पहा यंदाच्या वर्षभरातील विवहाचे शुभदायी मुहूर्त कोणते?
2019 मधील विवाह मुहूर्त कोणते?
नोव्हेंबर 2019 : 19, 20, 21,22, 23, 24, 25, 28,29 व 30
डिसेंबर 2019: 5, 6, 7, 11, 12।
2020 मधील विवाह मुहूर्त कोणते?
जानेवारी 2020: 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 29, 30 व 31
फेब्रुवारी 2020: 3,4,5,9, 10, 11,12, 13, 14, 15, 16, 17, 18 ,19, 20, 21, 25, 27 व 27
मार्च 2020: 1, 2, 3, 4, 7, 8, 9, 10, 11, 12 व 13
एप्रिल 2020: 14, 15, 25, 26 व 27
मे 2020: 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 17,18, 19, 23, 24 व 25
जून 2020: 13, 14, 15, 25, 26, 27,28, 29 व 30
नोव्हेंबर 2020: 26, 29 व 30
डिसेंबर 2020: 1, 2, 6, 7,8, 9, 10 व 11
आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हा हिंदू धर्मीयांच्या चातुर्मासाच्या काळात देव निद्रिस्त अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे या दिवसांमध्ये लग्न विधी केले जात नाहीत. मात्र कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नाचा बार उडवल्यानंतर आता देशभरात विवाह मुहूर्तांना सुरूवात होणार आहे.