Veer Savarkar 136th Birth Anniversary : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखणीतील अजरामर झालेली 3 महत्त्वाची गाणी
प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करुन स्वातंत्र्यवीर सावकरांची ही 3 गाणी
Veer Savarkar Birth Anniversary 2019: ज्या व्यक्तीची देशाविषयी तळमळ इतकी खोल होती की देशासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती अशा क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज 136 वी जयंती. सावकरांचा जन्म 28 मे 1983 रोजी भगूर येथे झाला. विचारवंत, लेखक,तत्त्वज्ञ, भाषाकार आणि स्वातंत्र्यसेनानी असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे रक्त जितके सळसळत होते तितकेच सळसळत त्यांची लेखणीही होती. त्यांच्या कविता, गाणी तसेच भाषणांमधून त्यांचे देशाविषयी असणारे प्रेम, तळमळ ही क्षणक्षणाला दिसून यायची. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या गाण्यांपैकी अशी काही खास गाणी आहेत जी ज्याची मशाल अजूनही तमाम भारतवासियांच्या मनात धगधगत आहे. त्यांची अजरामर झालेली ही गाणी आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात घर करुन आहेत आणि जी ते कधीच विसरु शकणार नाही. पाहा कोणती आहे ती 3 गाणी.....
सागरा प्राण तळमळला:
जयोस्तुते..श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे:
हा हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजी राजा...:
देशासाठी अन्नपाणी त्याग करणा-या स्वातंत्र्यवीर सावकरांची प्राणज्योत 26 फेब्रुवारी 1966 रोजी मालवली. ते 83 वर्षाचे होते. भारताला स्वातंत्र्य मिळावे म्हणून त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. अत्यंत खडतर प्रवास केलेला हा स्वातंत्र्यसैनिक त्याच्या प्रखर विचारांसाठी कायम सार्यांच्या लक्षात राहिला पण त्यांच्याबद्दल अजूनही अनेक गोष्टी आजच्या पिढीपर्यंत आलेल्या नाहीत. मात्र त्यांची ही 3 गाणी आजही कित्येकांच्या तोंडातून ऐकायला मिळतात.
अशा या धाडसी क्रांतिका-याला लेटेस्टली मराठी कडून कोटी कोटी प्रणाम...