Vat Purnima 2022 Wishes in Marathi: वट पौर्णिमा निमित्त WhatsApp Status, Quotes, Messages शेअर करत वट सावित्री व्रताच्या द्या शुभेच्छा
वट सावित्री व्रताची सांगता वट पौर्णिमेला पूजा करून केली जाते मग पतीच्या दीर्घायुष्यासाठी साजरा केल्या जाणार्या या सणानिमित्त खास मेसेजेस शेअर करत द्विगुणित करा या मंगलमय दिवसाचा आनंद!
Happy Vat Purnima 2022: पतीच्या दीर्घायुष्यासाठी महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी वट पौर्णिमा (Vat Purnima) साजरी करण्याची प्रथा आहे. या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी वडाची साग्र संगीत पूजा करून, वडाभोवती सूत गुंडाळून सातजन्मी हाच पती मिळावा म्हणून पत्नीकडून पूजा केली जाते. या पूजेच्या निमित्ताने वटपौर्णिमा साजरा करणार्या महिलावर्गाला सोशल मीडीयामध्ये Facebook Messages, WhatsApp Status, Wishes, HD Images द्वारा शुभेच्छा देऊन त्यांच्या दिवसाची सुरूवात आनंदमय आणि मंगलमय वातावरणामध्ये करू शकता.
वट पौर्णिमा हा सण सवाष्ण महिलांसाठी आणि प्रामुख्याने नववधूसाठी खास असते. पहिल्याच वटपौर्णिमेला नव्या नवरीप्रमाणे नटून थटून महिला बाहेर पडून वडाची पूजा करतात. हिंदू पुराणात सांगितलेल्या कथेनुसार, सावित्रीने आपला पती सत्यवान याचे प्राण यमाकडून 3 दिवस झगडून, बुद्धीचातुर्य वापरून परत मिळवले. सत्यवान-सावित्रीच्या याच अतुट बंधाचा गोडवा सार्या पती-पत्नीच्या नात्यामध्ये टिकावा म्हणून वट सावित्रीचं व्रत केले जाते. हे देखील नक्की वाचा: Vat Purnima 2022 Ukhane: वट पौर्णिमेच्या पूजेनंतर सख्यांकडून होणारा उखाण्यांचा हट्ट पुरवण्यासाठी खास वट सावित्री व्रत विशेष उखाणे!
वट पौर्णिमेच्या शुभेच्छा
त्या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावा तू
जन्मोजन्मी फक्त माझाच असावा तू
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण सौभाग्याचा
बंध अतुट नात्याचा
वटपौर्णिमेच्या आजच्या दिवशी
पूर्ण होवोत तुमच्या सार्या मनोकामना
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
सावित्रीच्या निष्ठेचे दर्पण
बांधुनी नात्याचं बंधन
करेन साता जन्माचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी
पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
आणि आयुष्य
तुम्हाला वटवृक्षासारख दीर्घायुष्य लाभू दे
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !
यंदा तिथीनुसार पौर्णिमेचा प्रारंभ 13 जून पासून होत आहे तर सांगता 14 जूनला होणार आहे. यामध्ये 12 जून पासून सुरू झालेलं वटसावित्रीचं व्रत वट पौर्णिमेची पूजा करून 14 जूनला संपणार आहे.