IPL Auction 2025 Live

Vat Purnima 2019: वटपौर्णिमा दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडालाच का दोरा गुंडाळतात? जाणून घ्या कारण

तसेच पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा येत्या 16 जून 2019 रोजी साजरी करण्यात येणार आहे.

Vat Purnima (Photo Credits-Facebook)

Vat Purnima Puja: जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच 'वटपौर्णिमा' सर्वत्र साजरी केली जाते. तसेच पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा येत्या 16 जून 2019 रोजी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या नवरोबाला दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे म्हणून उपवास ठेवून वडाच्या झाडाची पूजा करतात.

तर वटवृक्ष हा शिवरुपी असून वटवृक्षाची पूजा करणे, म्हणजेच वडाच्या झाडाची पूजा करुन शिवरुपी पतीला मिळवणे असे मानले जाते. त्याचसोबत पतीचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी यासाठी इश्वराची पूजा करणे होय. त्याचसोबत विवाहित महिला या कारणामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडालाच का दोरा बांधतात हे जाणून घ्या.

वटवृक्षाच्या खोडाच्या उभ्या छेदावर असणाऱ्या सुप्त लहरी शिवतत्व आकृष्ट करुन वायुमंडलात प्रक्षेपित करतात.तर ज्यावेळी विवाहित महिला वडाच्या झाडाला मुख्यत्वे सुती दोरा गुंडाळून त्याची पूजा करतात. त्यावेळी जिवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वासी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात. सुती दोरा गुंडाळल्याने त्यामधील पृथ्वी आणि आप या तत्वांच्या संयोगामुळे या लहरी जिवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात.

तसेच वडाच्या झाडाची पूजा करताना त्याच्या पायथ्याशी पाच फळे अर्पण केली जातात. तर सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाचे पूजन करून विवाहित महिला तिच्यासोबत आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करताना दिसून येतात.