Vat Purnima 2019: वडाच्या झाडाचे आरोग्यदायी फायदे काय?
या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. . पण तुम्हाला ठाऊक आहे का? वडाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर वडपौर्णिमे निमित्त जाणून घेऊया वडाच्या झाडाचे काही फायदे....
आपली संस्कृती अनेक सणांनी आणि परंपरांनी समृद्ध आहे. या सणांमागे नक्कीच काही विशेष उद्देश आहे. ऋतुमानानुसार वातावरणात, शरीरात होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी हे सण अनुरूप ठरतात. पूर्वीच्या स्त्रिया सणाला जोडल्या गेलेल्या धार्मिक गोष्टींवर श्रद्धा ठेऊन पूजा करत असतं. आजकालच्या नवीन, शिकलेल्या पिढीला ते जुनाट, भूरसटलेले वाटते. पण आपण जर सणांमागील शास्त्रीय कारण जाणून घेतली तर आपल्याला देखील सणांचे महत्त्व पटेल. (वटसावित्री व्रतारंभ ते वटपौर्णिमा पूजा करण्याचा यंदाचा शुभ मुहूर्त काय?)
आता वटपौर्णिमेचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दिवशी सर्व सुवासिनी स्त्रिया पतीच्या दिर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात. उपवास करुन इतर सवाष्ण स्त्रियांना वाण देतात. पण तुम्हाला ठाऊक आहे का? वडाच्या झाडाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तर वडपौर्णिमे निमित्त जाणून घेऊया वडाच्या झाडाचे काही फायदे:
# वडाचे झाड 24 तास ऑक्सिजन देते. त्यामुळे पूर्वी कधीच बाहेर न पडणाऱ्या स्त्रियांना पूजेनिमित्त काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात राहता येते. त्यामुळे त्यांना पुरेसा ऑक्सिजन व ताजी हवा मिळते. परिणामी त्यांना फ्रेश, चैतन्नमय वाटते.
# आजकाल स्त्रिया इतक्या व्यस्त झाल्या आहेत की निसर्गाचा उपभोग त्यांना घेता येत नाही. अशावेळी वटपौर्णिमेचे निमित्त साधून त्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळते.
# स्त्रीच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा खूप उपयोग होतो. Reproductive tract infection आणि योनीमार्गातील इन्फेकशन दूर करण्यासाठी वडाच्या झाडाच्या सालीचा उपयोग होतो.
# वडाच्या पारंब्या या केसवाढीसाठी उपयुक्त असतात.
# आजकाल नातेसंबंधातील तणाव, नैराश्य वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सुसंवादाचा अभाव हे आहे. अनेक स्त्रिया एकत्र आल्याने विचारांची देवाणघेवाण होते. सुसंवाद साधला जातो. त्यामुळे ताण दूर होण्यास नक्कीच मदत होते. (Vat Purnima 2019: स्मिता तांबे, सखी गोखले, सुरभी हांडे, नेहा गद्रे यंदा साजरी करणार पहिली वटपौर्णिमा)
# निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवल्यास त्यातून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल.
वटपौर्णिमा सणानिमित्त स्त्रिया एकमेकींना देत असलेल्या वाणाचे नेमके महत्त्व काय?
वाण देण्यातून दिल्याचे समाधान मिळतं. त्यातला ‘गिविंग ऑफ हॅप्पीनेस’ महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर वाणामध्ये असलेली आंबा, जांभूळ, करवंद, फणस, केळ ही फळं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण ती फारशी खाल्ली जात नाहीत. म्हणून त्यानिमित्ताने तरी ती खाल्ली जावी म्हणून वाण देण्याची प्रथा आहे. हे वाण तू तुझ्या आरोग्यासाठी वापर, असा छुपा संदेश यामागे आहे.