Utpanna Ekadashi 2023 Messages In Marathi: उत्पत्ती एकादशी निमित्त WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील.

Utpanna Ekadashi 2023 Messages (Photo Credit - File Image)
Utpanna Ekadashi 2023 Messages In Marathi: मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला भगवान विष्णूच्या दर्शनासाठी उत्पन्ना एकादशी (Utpatti Ekadashi 2023) व्रत पाळले जाते. 8 डिसेंबर रोजी पहाटे 05.06 वाजता एकादशी तिथी सुरू होत आहे. 9 डिसेंबर रोजी सकाळी 06:31 वाजता संपेल. त्यामुळे 8 डिसेंबर रोजी उत्पन्ना एकादशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. शास्त्रानुसार जो व्यक्ती उत्पन्ना एकादशीचा उपवास करतो, तो वैकुंठ धामला जातो. एकादशी महात्म्याचे पठण करणार्‍याला हजारो गोदानांचे पुण्य प्राप्त होते. हे व्रत केल्याने धर्म आणि मोक्ष प्राप्त होतो.

उत्पन्ना एकादशीच्या व्रतामुळे मिळणारे फळ हे अश्वमेध यज्ञ, कठोर तपश्चर्या, तीर्थक्षेत्रातील स्नान इत्यादींमुळे मिळणाऱ्या फळांपेक्षा अधिक असते, असे मानले जाते. या व्रताच्या मंगलमय शुभेच्छा तुम्ही WhatsApp Status, Facebook Messages, Wishes, Greetings द्वारा आपल्या मित्र-परिवारास पाठवू शकता. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Margashirsha Mahalaxmi Guruvar Vrat 2023 Dates: 13 डिसेंबर ते 11 जानेवारी मार्गशीर्ष महिना; पहा महालक्ष्मी व्रत कोणते 4 दिवस!)

Utpanna Ekadashi 2023 Messages (Photo Credit - File Image)
Utpanna Ekadashi 2023 Messages (Photo Credit - File Image)
Utpanna Ekadashi 2023 Messages (Photo Credit - File Image)
Utpanna Ekadashi 2023 Messages (Photo Credit - File Image)

उत्पन्ना एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्ताच्या वेळी देवाची पूजा फुल, धूप, दीप, चंदन, अक्षत, फळे, तुळस इत्यादींनी करावी. या दिवशी 'ओम नमो भगवते वासुदेवाय' चा जप करणे आणि विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करणे शुभ मानले जाते.