Tulsi Vivah Invitation Marathi Messages Format: तुळशीच्या लग्नाचं निमंत्रण WhatsApp Status, Facebook, Instagram Messages द्वारा शेअर करत आप्तेष्टांनाही द्या आमंत्रण!
घरातील विवाह सोहळे त्यानंतर संपन्न करण्याची रीत आहे. विवाह हा भारतीय आणि हिंदू संस्कृतीमधील एक महत्त्वाचा आणि तितकाच पवित्र संस्कार मानला जातो.
महाराष्ट्रात दिवाळीची सांगता देव उठनी एकादशी नंतर द्वादशीला तुळशीचं लग्नं लावून केली जाते. यंदा हा तुलसी विवाहाचा (Tulsi Vivah) आरंभ 24 नोव्हेंबरला होणार असून 27 नोव्हेंबरला त्याची सांगता होणार आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीचं लग्न शाळीग्राम सोबत लावली जातात. एखाद्या लग्नाप्रमाणेच ही तुळशीची लग्नं देखील धूमधडाक्यात लावण्याची रीत आहे. तिन्ही सांजेला घरातील किशोरवयीन मुलगा नवरदेव म्हणून उभा करून त्याचा प्रातिनिधिक विवाह तुळशी मातेशी लावला जातो. मग यंदा तुमच्या घरातील तुळशीच्य लग्नाला तुम्ही आप्तेष्ट, नातेवाईक, प्रियजनांना बोलावणार असाल तर त्यांच्यासाठी आमंत्रण पत्रिकेचे हे नमुने WhatsApp Messages, Facebook Messages द्वारा शेअर करत त्यांना तुमच्या घरी आमंत्रित करू शकता.
तुळशीला एका नववधूप्रमाणे सजवून तिचा तिन्हीसांजेला विवाह लावण्याचा कार्यक्रम 4 दिवसांत कधीही आखला जाऊ शकतो. या निमित्ताने सारेजण एकत्र येतात. मंगलअष्टकं म्हटली जातात. गोडा-धोडाचे पदार्थ वाटले जातात. फटाके फोडून विवाह संपन्न झाल्याची घोषणा केली जाते. मग या कार्यक्रमाचे निमंत्रणही तुम्ही कल्पकतेने देऊ शकता. Tulsi Vivah Rangoli Designs 2023: तुळशी विवाह निमित्त दारात आकर्षक रांगोळ्या काढत साजरा करा सण! (Watch Video) .
तुलसी विवाह निमंत्रण मेसेजेस
नमुना 1:
आज आमच्या तुळशीच्या लग्नाला यायच हं...
वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता
स्थळ- तुळशी वृंदावन
लग्न आमच्या दारात आणि जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!
नमुना 2:
॥ तुळशीविवाह ॥
चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी
यांचा विवाहसोहळा आमच्या घरी शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
विवाहस्थळ:
नमुना 3:
कुर्यात सदा मंगलम!
आमच्या येथे 27 नोव्हेंबर दिवशी सायंकाळी 7.07 च्या मुहूर्तावर तुलसीविवाह संपन्न होणार आहे,
तरीही आपण यंदाही आपल्या उपस्थितीसाठी हे अगत्याचं आमंत्रण!
आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!
विवाह तारीख - 27, नोव्हेंबर
विवाह मुहूर्त- सायंकाळी 7.07
तुळशीची लग्नं लागल्यानंतर सर्वत्र लग्नाचा मोसम सुरू होते. घरातील विवाह सोहळे त्यानंतर संपन्न करण्याची रीत आहे. विवाह हा भारतीय आणि हिंदू संस्कृतीमधील एक महत्त्वाचा आणि तितकाच पवित्र संस्कार मानला जातो.